पिंपरी : गणेशोत्सव आणि आगामी सणासुदीच्या काळात शहरात अखंड वीजपुरवठा सुरू राहावा, यासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी विशेष दक्षता घ्यावी, अशी सूचना खासदार श्रीरंग बारणे यांनी आज (शुक्रवारी) दिली.
पिंपरी-चिंचवड शहरातील वीजपुरवठ्याशी संबंधित समस्यांचे निराकरण करण्यासाठी पिंपरी येथील महावितरण विभागीय कार्यालयात खासदार बारणे यांच्या प्रमुख उपस्थितीत बैठक पार पडली. या वेळी महावितरणचे अधीक्षक अभियंता शहाजीराव गायकवाड, कार्यकारी अभियंता सोमनाथ मुंडे आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
गेले काही दिवस शहरात वारंवार होणाऱ्या वीजपुरवठ्याच्या खंडित होण्याच्या समस्यांवर चर्चा करताना खासदार बारणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना नागरिकांच्या तक्रारींची दखल घेण्याचे आदेश दिले. विशेषतः गणेशोत्सवाच्या काळात वीजपुरवठा अखंड राहावा यासाठी भूमिगत वीजवाहिन्यांच्या देखभालीसाठी विशेष उपाययोजना कराव्यात, असे निर्देश दिले.
केंद्र शासनाच्या योजना विषयी जनजागृती करा : बारणे
केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेसह अन्य योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी महावितरणने पुढाकार घ्यावा, असेही बारणे यांनी सुचवले. प्रधानमंत्री सूर्यघर योजनेद्वारे नागरिकांना मोफत वीज तसेच वीज विक्रीतून उत्पन्न मिळण्याची संधी आहे.
Reviewed by ANN news network
on
९/०७/२०२४ ०८:४०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: