पुण्यात मोठी कारवाई: प्रवाशांना रेल्वेतिकिट मिळवून देण्याच्या बहाण्याने लुटणारी बिहारी टोळी अटकेत!

 


पुणे : फरासखाना पोलीस ठाण्या्चे प्रभारी अधिकारी  प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली पुणे शहर पोलिसांनी एका मोठ्या कारवाईत बिहार राज्यातील १० सदस्यीय टोळीला अटक केली आहे. या टोळीने रेल्वे स्टेशनवर प्रवाशांना लक्ष्य करून त्यांची फसवणूक करून लुटल्याचे उघडकीस आले आहे.

२५ ऑगस्ट २०२४ रोजी घडलेल्या या प्रकरणात, एका व्यक्तीला त्याच्या वडिलांच्या अपघाताच्या बातमीनंतर बिहारला जाण्यासाठी तिकीट काढताना या टोळीने गाठले. रेल्वे विभागात काम करणाऱ्या नातेवाईकाची ओळख सांगून, ऑनलाइन तिकीट काढून देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर पीडितास गणेश पेठेतील डुल्या मारुती मंदिराजवळ नेऊन, त्याचा मोबाईल फोन, एटीएम कार्ड, आधारकार्ड आणि पॅनकार्ड हिसकावून घेतले. 

दुसऱ्या दिवशी, २६ ऑगस्टपर्यंत या टोळीने पीडिताच्या खात्यातून एकूण ३ लाख ०३ हजार ८०० रुपये काढले. फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर, पोलिसांनी तात्काळ कारवाई करत २४ तासांत या टोळीला जेरबंद केले.

पकडलेल्या आरोपींमध्ये राजा युनूस पिंकू (१९), मोहम्मद सुलतान मोहम्मद तौहिद शेख (१८), मुन्ना जोधन साह (४१, मुख्य सूत्रधार), राकेश कपलेश्वर पासवान (३२), बिशम्बर मोसफिर दास (२५), धर्मेन्द्रकुमार असरफिया साह (२८), जितेन्द्रकुमार मोहन सहनी (२६), राजेद्रकुमार सुखदेव महतो (२८), दिनेश हरी पासवान (२७), आणि पिताम्बर मोसाफिर दास (२९) यांचा समावेश आहे.

पोलिसांनी या टोळीकडून ४१ मोबाईल फोन, १ लाख ४३ हजार ०२० रुपये रोख, तसेच विविध व्यक्तींची आधारकार्ड, पॅनकार्ड आणि एटीएम कार्ड जप्त केली आहेत. एकूण ५ लाख ७७ हजार १९० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

तपासात असे उघडकीस आले की, ही टोळी दहीहंडी आणि गणेशोत्सवादरम्यान पुण्यात येत असे. रेल्वेस्टेशनवर थांबून ते परगावी जाणाऱ्या प्रवाशांना ऑनलाइन तिकीट काढून देण्याचे आमिष दाखवत असत. त्यानंतर त्यांना एकांत ठिकाणी नेऊन मारहाण करून त्यांचे एटीएम कार्ड, पॅनकार्ड आणि आधारकार्ड हिसकावून घेत असत. 

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त  प्रवीणकुमार पाटील,  उप आयुक्त संदीपसिंह गिल, आणि सहाय्यक  आयुक्त नूतन पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. फरासखाना पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक  प्रशांत भस्मे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथकाने ही यशस्वी कारवाई केली.

या घटनेमुळे नागरिकांनी अनोळखी व्यक्तींपासून सावध राहण्याचे आणि आपल्या वैयक्तिक माहितीची काळजी घेण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

पुण्यात मोठी कारवाई: प्रवाशांना रेल्वेतिकिट मिळवून देण्याच्या बहाण्याने लुटणारी बिहारी टोळी अटकेत! पुण्यात मोठी कारवाई:  प्रवाशांना रेल्वेतिकिट मिळवून देण्याच्या बहाण्याने लुटणारी बिहारी टोळी अटकेत! Reviewed by ANN news network on ९/०७/२०२४ ०८:३५:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".