प.पू.संत तुळशीदास महाराज यांच्या नावाने पुरस्कार प्रदान
श्रीगोंदा:-
श्रीगोंदा तालुक्यातील खरातवाडी ग्रामस्थांच्यावतीने खासदार
निलेश लंके यांना प.पू. "संत तुळशीदास महाराज" यशवंत सन्मान पुरस्कार देऊन, तसेच ज्ञानदेव लंके गुरजी व त्यांच्या पत्नी शकुंतला लंके यांना प.पू." संत तुळशीदास महाराज" कृतज्ञता सन्मान देऊन गौरविण्यात आले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब भोस होते कार्यक्रमास
मा. आमदार राहुल जगताप, पिंपरी चिंचवडचे मा. नगरसेवक मारुती भापकर घनश्याम शेलार, शकुंतला लंके, अक्षदा लंके,वंदना गंधाक्ते, सतिश गंधाक्ते, संतोष गावडे,सचिन पठारे, टिळक भोस, स्मितल भैया वाबळे,माऊली हिरवे, उत्तम डाके, राजेंद्र चेडे, सुभाषराव काळाणे,संदिप तरटे, राजेंद्र
शेरकर,सुदाम पवार , संदीप तरटे, सूर्यजित पवार आदि उपस्थित होते.
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातून विजय मिळवल्याबद्दल खासदार निलेश लंके यांचा तसेच सन १९७० पासून सन१९८४ अशी १४ वर्षे शिक्षक म्हणून खरातवाडी गावात शैक्षणिक कार्य करून या गावातील पिढ्या घडवण्याचे उत्तुंग काम केल्याबद्दल ज्ञानदेव लंके गुरुजी व त्यांच्या धर्मपत्नी शकुंतला लंके यांचा हा नागरी सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना माजी नगरसेवक मारुती भापकर यांनी आपल्या भाषणात खरातवाडी परिसरातील काही महत्त्वाच्या समस्या मांडल्या; खरातवाडीतील हंगा नदी व पळसनाला येथील तात्पुरते पूल पावसामुळे वाहून जातात त्यामुळे येथील शेतकरी, विद्यार्थी, जनावरे यांना जीव मुठीत धरून नदी पार करावी लागते. त्यामुळे या नदीवरील पक्के पुल व्हावेत, तसेच घारगाव खरातवाडी एरंडोली व इतर रस्त्यांची कामे वर्षानुवर्ष झालेली नाहीत. ती कामे तातडीने व्हावेत. तसेच खरातवाडीची स्वतंत्र ग्रामपंचायत व्हावी आदि मागण्या केल्या केल्या.
कुकडी प्रकल्पाचा मुद्दा
मारुती
भापकर यांनी कुकडी
प्रकल्पासंदर्भात
महत्त्वाचा मुद्दा मांडला. त्यांनी सांगितले की
सहकार मंत्री दिलीप
वळसे पाटील यांनी
पुणे जिल्ह्यातील ६६
बंधारे कुकडी प्रकल्पात समाविष्ट करण्याची आणि
डिंभे-माणिकडोह बोगदा
रद्द करण्याची मागणी
केली आहे. मात्र,
हा निर्णय झाल्यास श्रीगोंदा, पारनेर,
कर्जत, जामखेड आणि
करमाळा या तालुक्यांचे वाळवंट
होण्याची शक्यता आहे असे नमूद करून
सर्वपक्षीय नेत्यांनी एकत्र
येऊन या प्रश्नावर संघर्ष
करण्याचे आवाहन केले आणि
खासदार निलेश लंके
यांना यासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन
केले.
खासदार निलेश लंके
यांचे
आश्वासन
खासदार निलेश लंके यांनी या विषयावर ठाम भूमिका घेतली. त्यांनी सांगितले की कुकडीच्या पाण्याबाबत पुणेकरांची दादागिरी यापुढे खपवून घेतली जाणार नाही. त्यांनी या संदर्भात पत्रव्यवहार केल्याचे सांगितले आणि श्रीगोंदा, पारनेर, कर्जत, जामखेड, करमाळा येथील शेतकऱ्यांवर होणारा अन्याय सहन केला जाणार नाही, असे ठाम मत व्यक्त केले. आवश्यकता भासल्यास शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी दर्शवली. लंके यांनी खरातवाडीतील ग्रामस्थांच्या सर्व समस्यांचे निराकरण करण्याचे अभिवचन दिले.
राहुल जगताप यांचे
विचार
मा. आमदार राहुल जगताप यांनी खासदार निलेश लंके यांच्या निवडणुकीतील प्रचंड विजयाचा उल्लेख करून, त्यांच्याकडून श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी विशेष प्रयत्न होतील, अशी अपेक्षा व्यक्त केली. त्यांनी सांगितले की श्रीगोंदा तालुक्याच्या विकासासाठी पारनेर तालुक्यापेक्षाही अधिक प्रयत्न करण्याची जबाबदारी लंके यांच्यावर आहे.
घनश्याम शेलार यांचे
मत
घनश्याम शेलार यांनी कुकडीच्या प्रश्नावर शेतकऱ्यांनी एकत्र येण्याचे आवाहन केले. खासदार लंके यांना या प्रश्नावर नेतृत्व करण्याचे आवाहन केले आणि सर्व शेतकरी त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहतील असे आश्वासन दिले.
बाबासाहेब भोस यांचे
विचार
कार्यक्रमाचे अध्यक्ष बाबासाहेब भोस यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसंदर्भात महत्त्वाचे विचार मांडले. त्यांनी सांगितले की तालुक्यात महाविकास आघाडीकडून अनेक उमेदवार इच्छुक आहेत. मात्र, जर दोन किंवा तीन उमेदवार उभे राहिले तर महायुतीच्या उमेदवाराला त्याचा फायदा होऊ शकतो. त्यामुळे महाविकास आघाडीने निवडलेल्या उमेदवारासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम केले तर विजय निश्चित होईल, असे मत त्यांनी व्यक्त केले. त्यांनी सर्व इच्छुक उमेदवारांमध्ये एकी राखण्याचे आवाहन केले.
विशेष सन्मान
या कार्यक्रमात एकाच परिवारातील तीन मुली आणि एक मुलगा पोलीस खात्यात भरती झाल्याबद्दल सोनाली मोटे, रुपाली मोटे, रोहिणी मोटे आणि ज्ञानेश्वर मोटे यांचा विशेष सत्कार करण्यात आला. तसेच, प्रवीण शेंडगे यांची शिक्षक विभागात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला. खासदार निलेश लंके व आमदार राहुल जगताप यांच्या हस्ते या सर्वांना शाल, श्रीफळ आणि स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे यशस्वी
आयोजन
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सुरेश भापकर, लक्ष्मण इथापे, मारुती भापकर, राहुल शेंडगे, महेश यादव, सचिन भापकर, सुजित इथापे, ज्ञानदेव भापकर, कृष्णा यादव, दत्तात्रय भापकर, तात्या इथापे, मधुकर सुपेकर, बंडू सलगर, किसन बाबुराव इथापे, बापूराव देवकाते, नितीन भापकर, शहाजी शेंडगे, आप्पा बाबुराव इथापे, संजय फराटे, गणेश इथापे, चंद्रकांत भापकर, संजय चौगुले, नाना इथापे, सुरेश चौगुले, राजेंद्र भापकर, डॉ. सचिन जगताप, चंद्रकांत भापकर, सुधीर भापकर, तुषार इथापे, शरद इथापे, शहाजी भापकर, अतुल पुराणे, श्याम बारगुजे आदी कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मधुकर सुपेकर यांनी केले, तर बापूराव देवकाते यांनी आभार मानले.
Reviewed by ANN news network
on
९/२२/२०२४ ०३:५७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: