भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्टस् असोसिएशन च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ प्रसंगी ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद ,संयोजक अमानत शेख , भाजपचे प्रवक्ते अली दारूवाला, पोलिस उपायुक्त आर.राजा, इक्बाल अन्सारी, एड.अयुब शेख
शिक्षकांना रोजच सौजन्याने वागवा : ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद
पुणे : भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्टस् असोसिएशन च्या वतीने शिक्षक दिनाच्या निमित्ताने आदर्श शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्याचा सत्कार समारंभ ५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता आयोजित करण्यात आला होता. म.फुले सभागृह (वानवडी) येथे हा कार्यक्रम झाला. हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रझा मुराद , कार्यक्रमाचे संयोजक अमानत शेख , भाजपचे प्रवक्ते आणि केंद्रीय अल्पसंख्यांक आयोगाचे सल्लागार अली दारूवाला,पोलिस उपायुक्त आर.राजा यांच्या हस्ते हा सत्कार करण्यात आला.एकूण २० शिक्षक,१० शिक्षकेतर कर्मचारी आणि २५ गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला.
रझा मुराद म्हणाले,'गुणवंत शिक्षकांचा सन्मान,शिक्षक दिनी करण्याचा भारतरत्न मौलाना आझाद सोशल एज्युकेशन अँड स्पोर्टस् असोसिएशनचा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे.मौलाना आझाद हे थोर समाजशिक्षक होते.सामाजिक बांधिलकीची शिकवण आपण त्यांच्याकडून घ्यायला हवी. मी स्वतः शिक्षकांचा खूप आदर करतो.माझ्या हस्ते शिक्षकांचा सन्मान होतो आहे ,हा माझाच सन्मान आहे.शिक्षक हा समाज घडविणारा महत्वाचा घटक असतो.एरवीही आपण दैनंदिन आयुष्यात त्यांना सन्मानाची वागणूक दिली पाहिजे'.आर.राजा म्हणाले,'शिक्षक समाजात चांगल्या वागणुकीचे प्रशिक्षण देत असतात.चांगले नागरिक घडले तर पोलिसांचे काम सुकर होते.त्यादृष्टीने पोलीस दलासाठी शिक्षकांचे काम मोलाचे ठरते.शिक्षकांमुळेच आपण चांगल्या पदावर पोचतो'.
मुबारक जमादार, अमानत शेख, अली दारुवाला यांनी मार्गदर्शन केले.मीना नेल्सन यांनी प्रास्ताविक केले.इक्बाल अन्सारी यांनी स्वागत केले. रफिक तांबोळी यांनी आभार मानले. .डॉ.सलीम यांच्यासह अनेक मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. एड.अयूब शेख,नासिर शेख, मेहबूब सय्यद,विजय कुमार, आदम सय्यद, हरून खान इत्यादी उपस्थित होते.गाणी तसेच करमणुकीचा कार्यक्रमही यावेळी सादर करण्यात आला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: