पुणे : गणपती महोत्सव-2024 दरम्यान प्रवाशांची अतिरिक्त गर्दी कमी करण्यासाठी रेल्वेने खालील विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेतला आहे. तपशील पुढीलप्रमाणे आहे.
1. गाडी क्रमांक 01445 / 01446 पुणे जंक्शन-रत्नागिरी-पुणे जंक्शन स्पेशल (साप्ताहिक) - (2 फेर्या)
गाडी क्रमांक 01445 पुणे जंक्शन-रत्नागिरी स्पेशल (साप्ताहिक) मंगळवारी म्हणजेच 10/09/2024 रोजी पुणे जंक्शनहून 00:25 वाजता रवाना होईल. गाडी त्याच दिवशी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01446 रत्नागिरी-पुणे जंक्शन स्पेशल (साप्ताहिक) बुधवारी म्हणजेच 11/09/2024 रोजी रत्नागिरीहून 17.50 वाजता रवाना होईल. गाडी पुढील दिवशी 05:00 वाजता पुणे जंक्शन येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्टेशन
संरचना: एकूण 20 एलएचबी डबे = 2 टियर एसी - 03 डबे, 3 टियर एसी - 15 डबे, 1 जनरेटर कार आणि एक सामान सह गार्ड ब्रेक व्हॅन
2. गाडी क्रमांक 01447/01448 पुणे जंक्शन - रत्नागिरी - पनवेल जंक्शन स्पेशल (साप्ताहिक) (4 फेर्या)
गाडी क्रमांक 01447 पुणे जंक्शन - रत्नागिरी स्पेशल (साप्ताहिक) शनिवार म्हणजेच 07/09/2024 आणि 14/09/2024 रोजी पुणे जंक्शनहून 00:25 वाजता रवाना होईल. गाडी त्याच दिवशी 11:50 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल.
गाडी क्रमांक 01448 रत्नागिरी-पुणे जंक्शन स्पेशल (साप्ताहिक) रविवार म्हणजेच 08/09/2024 आणि 15/09/2024 रोजी 17.50 वाजता रत्नागिरीहून रवाना होईल. गाडी पुढील दिवशी 05:00 वाजता पुणे जंक्शन येथे पोहोचेल.
थांबे: चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजडी, खेड़, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड स्टेशन
संरचना: एकूण 22 डबे = 2 टियर एसी - 01 डबा, 3 टियर एसी - 04 डबे, स्लीपर - 11 डबे, जनरल - 04 डबे, एक सामान सह गार्ड ब्रेक व्हॅन - 02
आरक्षण: 01445/01446, 01447/01448 या गाड्यांचे बुकिंग 07.08.2024 पासून सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रे आणि वेबसाइट www.irctc.co.in वर सुरू होईल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: