हिंदु राष्ट्र समन्वय समितीच्या आंदोलनाद्वरे विविध मागण्या !
पुणे - सध्या बांगलादेशमध्ये हिंदूंची स्थिती अत्यंत चिंताजनक आहे. राजकीय अस्थिरतेमुळे हिंदू समुदायावर मोठ्या प्रमाणात हल्ले होत आहेत. अलीकडील घटनांमध्ये हिंदूंची घरे, मंदिरे आणि अन्य संपत्ती यांच्यावर जोरदार हल्ले करण्यात आले आहेत. या हिंसाचारात 5 ऑगस्टपासून, सुमारे 230 लोकांचा मृत्यू झाला असून, बांगलादेशातील 64 जिल्ह्यांपैकी 52 जिल्ह्यांमध्ये हिंदूविरोधी हिंसाचाराच्या घटना घडल्या आहेत. बांगलादेशने जरी हिंदूंचे रक्षण करण्याचे आश्वासन दिले असेल, तरी भारत सरकारने त्यावर अवलंबून न रहाता हिंदुं समाजाच्या आणि मंदिरांच्या रक्षणासाठी तातडीने पावले उचलावीत,अशी मागणी हिंदु राष्ट्र समन्वय समितीने आंदोलनाद्वारे केली आहे. या मागणी करीता आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी दुपारी 4 ते 6 या वेळात कै. स. गो. बर्वे चौक,मॉडर्न कॅफे जवळ,पुणे येथे आंदोलन घेण्यात आले. विविध हिंदु संघटना यामध्ये सहभागी झाल्या होत्या.
शेख हसीना सरकारच्या पतनानंतर हिंदूंच्या विरोधातील हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. विशेषत: ग्रामीण भागात हिंसाचार अधिक आहे, जिथे हिंदू समुदाय असुरक्षिततेच्या वातावरणात जीवन जगत आहे.
बांगलादेश सरकारच्या नव्या हंगामी प्रशासनाने स्थिती सुधारण्यासाठी काही पावले उचलली असली तरी, हिंदू समुदायात अजूनही भीती आणि असुरक्षितता आहे.
आंदोलनात करण्यात आलेल्या मागण्या
बांगलादेशातील हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर हिंदु राष्ट्र समन्वय समितीने पुढील मागण्या केल्या आहेत. बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ले, घरांची लूट, मंदिरांवरील हल्ले, मूर्तींची तोडफोड, महिलांवरील अत्याचार थांबवण्यासाठी तेथील सैन्य दलाला कठोर सूचना द्याव्यात. बांगलादेशातील हिंदूंवरील वाढते हल्ले लक्षात घेता तेथील हिंदूंना सुरक्षित ठिकाणी हलवावे आणि त्यांना तातडीने सुरक्षा पुरवावी.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: