पिंपरी : महाळुंगे येथे पाचजणांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण करून खून केला. हा प्रकार १९ आणि २० ऑगस्ट रोजी घडला. पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.
संकेत रामचंद्र गावडे (वय २३) असे मृत व्यक्तीचे नाव असून त्यांच्या खुनाच्या आरोपावरून महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी दीपक मधुकर जाधव, दीपक सुभाष सोनवणे, तेजस सोपान गाढवे, सचिन बालाजी चांदुरे, आणि अक्षय मारुती पाटील या पाच आरोपींना अटक केली आहे.
१९ ऑगस्ट संकेत गावडे हे त्यांची पत्नी आणि मुलांसह महाळुंगे येथील जयदीप हॉटेलमध्ये जेवण्यासाठी गेले होते. हॉटेलच्या बाहेर थांबलेल्या पत्नीच्या अंगावर दीपक सुभाष सोनवणे आणि त्याच्या मित्राने चिठ्ठी फेकली. गावडे यांनी या घटनेचा संकेत सोनवणे याला जाब विचारला असता, सोनवणेने संकेत यांना साई अमृत लॉज येथे बोलावून इतर आरोपींच्या साह्यानेत्यांच्यावर लोखंडी दांडक्याने आणि लाथाबुक्क्यांनी हल्ला केला. त्यांना गंभीर जखमी अवस्थेत रुग्णालयात दाखल करण्यात आले, पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.
महाळुंगे एमआयडीसी पोलिसांनी आरोपींना अटक केली आहे.पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: