पिंपरी : मालवण येथील राजकोट किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याच्या घटनेचा निषेध करण्यासाठी आम आदमी पार्टीच्या पिंपरी चिंचवड शहर शाखेने आज २९ ऑदस्ट रोजी आंदोलन केले. डांगे चौक, थेरगाव येथील शिवाजी पुतळ्यासमोर झालेल्या या आंदोलनात पक्षाच्या अनेक नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
पिंपरी चिंचवड शहराच्या आम आदमी पार्टीच्या अध्यक्षा मीना जावळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या आंदोलनात महाराष्ट्र सरकारच्या अक्षम्य दुर्लक्षाविरोधात जोरदार निषेध नोंदवण्यात आला. जावळे यांनी या प्रसंगी तीव्र शब्दांत सरकारवर टीका केली.
आंदोलनात सहभागी झालेल्या अन्य प्रमुख नेत्यांमध्ये चेतन बेंद्रे (पदवीधर आघाडी महाराष्ट्र राज्य) आणि संतोष इंगळे (उद्योग आघाडी सचिव, महाराष्ट्र राज्य) यांचाही समावेश होता. या दोघांनीही सरकारच्या कारभाराबद्दल कडक शब्दांत नाराजी व्यक्त केली.
आंदोलनस्थळी उपस्थित असलेल्या पक्षाच्या कार्यकर्त्यांमध्ये रविराज काळे, वैजनाथ शिरसाठ, ब्रह्मानंद जाधव, सुरेश बावनकर, अजय सिंग, रोहित सरनोबत, गायकवाड, सरोज कदम, भारती जाधव, दमयंती नेरकर, सीमा बावनकर, सचिन थोरात, जावळे मामा यांचा समावेश होता.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: