पुणे: महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे ग्रंथालय आणि युवक क्रांती दलाच्या वतीने 'किताबे कुछ कहती है ' हा चर्चात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे . शनिवार,दि.३१ ऑगस्ट रोजी सायंकाळी ४ ते ६ या वेळेत हा कार्यक्रम गांधी भवन(कोथरूड) येथे होणार आहे.
प्रसिद्ध लेखक दिवंगत चिं. वि. जोशी यांच्या ' आमचा पण गाव ' या पुस्तकावर चर्चा आयोजित करण्यात आली असून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या इतिहास विभागप्रमुख प्रा.श्रद्धा कुंभोजकर मार्गदर्शन करणार आहेत .महाराष्ट्र गांधी स्मारक निधीचे अध्यक्ष डॉ. कुमार सप्तर्षी हे या उपक्रमाचे निमंत्रक असून प्रा.डॉ.शशिकला राय या समन्वयक आहेत.कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन अन्वर राजन,जांबुवंत मनोहर,अप्पा अनारसे,अॅड.स्वप्नील तोंडे,कैलास यादव यांनी केले आहे .
'किताबे कुछ कहती है ' चर्चात्मक कार्यक्रम ३१ ऑगस्ट रोजी
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२४ ०७:५९:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२४ ०७:५९:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: