रत्नागिरी : मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर खेडजवळ २७ ऑगस्ट रोजी रात्री पेट्रोलिंग दरम्यान, खेड शहरात भरणे नाका येथे पोलिसांनी एका संशयास्पद कारमधून २२ किलो गांजा जप्त केला. या प्रकरणी तीन व्यक्तींना अटक करण्यात आली आहे, ज्यात एका परप्रांतियाचा समावेश आहे.
उदयसिंह मदनसिंह चुंडावत, वय ३७, पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड, विशाल विद्याधर कोकाटे, वय ३४, पोस्ट ऑफिस बिल्डिंग, मंडणगड, सिध्देश उदय गुजर, वय ३२, पाटरोड, आदर्शनगर, मंडणगड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार मुंबई-गोवा महामार्गावर खेड शहराजवळ भरणे नाका येथे रात्री २२:४५ वाजता पोलिसांनी एक पांढऱ्या रंगाची चारचाकी कार दोन दरवाजे उघडे करून उभी असल्याचे पाहिले. वाहनाच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने, पोलिसांनी तपासणी केली आणि वाहनामध्ये तीन जण आढळले. वाहनात असलेल्या बॅग्समध्ये गांजा असल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी गाडीतील तीन संशयितांकडून ४ लाख ४१ हजार १८० रुपये किंमतीचा २२ किलो गांजा ६ लाख रुपये किमतीची महिंद्रा कंपनीची चारचाकी गाडी असा एकूण १० लाख ४१ हजार ३८० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.
ही कारवाई स्थानिक गुन्हा अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक जनार्दन परबकर खेडचे उपनिरीक्षक नितीन भोयर, प्रशांत बोरकर, सुभाष भागणे, शांताराम झोरे, बाळू पालकर, अतुल कांबळे आणि वैभव ओहोळ यांनी केली.
Reviewed by ANN news network
on
८/२८/२०२४ ०४:३९:०० PM
Rating:


कोणत्याही टिप्पण्या नाहीत: