पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील पिंपळे सौदागर येथील रोझलँड सोसायटीत १३ जुलै रोजी एका १४ वर्षांच्या मुलाने इमारतीच्या सातव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केली. या मुलाचे नाव मल्हार मकरंद जोशी असून तो नववीत शिकत होता. त्याच्या आत्महत्येचे कारण अद्याप अज्ञात आहे.
घटनेचा तपशील
मिळालेल्या माहितीनुसार, मल्हारचे आई-वडील कार्यक्रमानिमित्त बाहेरगावी गेले होते. त्यामुळे मल्हार हा बिल्डिंगमध्ये आईच्या मैत्रिणीच्या घरी थांबला होता. आज सकाळी, तो फोनवरून आई-वडिलांशी बोलत असताना अचानक फोन कट केला आणि फोन फेकून दिला. त्यानंतर तो थेट पळत जाऊन सातव्या मजल्याच्या गॅलरीतून खाली उडी घेतली.
रुग्णालयात उपचार
शेजाऱ्यांनी त्वरित त्याला खासगी रुग्णालयात दाखल केले, मात्र उपचारादरम्यान दुपारी अडीच वाजता त्याचा मृत्यू झाला.
पुढील तपास
मल्हारचे पालक परळी येथे होते आणि त्यांना घटनेची माहिती देण्यात आली आहे. सांगवी पोलीस पुढील तपास करीत आहेत. मल्हारच्या आत्महत्येचे कारण समजण्यासाठी अधिक चौकशी केली जात आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: