पिंपरी : लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंत्ती महोत्सव व्यापक स्वरूपात साजरा करण्यात यावा, यामध्ये राज्यातील नामवंत विचारवंत, साहित्यिक आणि कलाकारांचा समावेश असावा अशी मागणी नवनिर्वाचित आमदार अमित गोरखे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंग यांना केली आहे. पिंपरी चिंचवड महापालिका दरवर्षी १ ऑगस्ट ते ५ ऑगस्ट दरम्यान "प्रबोधन विचार पर्व" अंतर्गत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे जयंती महोत्सव साजरा करते. यानुसार, या वर्षी महोत्सवाच्या आयोजनात जास्तीत जास्त निधी मिळावा यासाठी महापालिका आयुक्तांशी चर्चा करण्यात आली.
आमदार गोरखे यांनी आयुक्त शेखर सिंग यांची भेट घेऊन शहरातील नागरिकांच्या विविध समस्यांवर चर्चा केली. झोपडपट्टीतील नागरिकांच्या समस्या मोठ्या प्रमाणावर प्रलंबित असल्यामुळे त्या समस्यांचे त्वरित निराकरण करण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.
अमित गोरखे यांनी सांगितले की, पिंपरी चिंचवड मधील नागरिकांसाठी मी सदैव तयार आहे. महापालिका किंवा राज्य शासनाच्या माध्यमातून येथील नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मी सर्वतोपरी प्रयत्न करणार आहे. महापालिका आयुक्तांनी या मुद्द्यावर सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले आहे, असेही त्यांनी नमूद केले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: