लयशाळा ललित कला फाउंडेशनकडून आयोजन
पुणे : लयशाळा ललित कला फाउंडेशन(वाघोली) च्या विद्यार्थ्यांच्या वतीने गुरु पौर्णिमेच्या निमित्ताने 'गुरु समर्पण' कथक नृत्य कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. गुरु आणि परंपरेबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विशेष नृत्य कार्यक्रम दि.२३ जुलै २०२४ रोजी सायंकाळी ६:३० वाजता ओझोनविला क्लब हाऊस(वाघोली) येथे नृत्यगुरु आस्था गोडबोले-कार्लेकर यांच्या उपस्थितीत आयोजित करण्यात आला आहे. या मध्ये आद्या बोरवणकर,आराध्या सिन्हा,प्रीषा काकोडे,श्रिया साळुंखे,प्रीषा बडगुजर, आद्या चौरसिया, अन्वी सिन्हा,भाव्या सिंग,अनहद आशिर्या हे विद्यार्थी -विद्यार्थिनी शिकलेल्या विविध रचना सादर करणार आहेत.
'गुरु समर्पण'-कथक नृत्य कार्यक्रम २३ जुलै रोजी
Reviewed by ANN news network
on
७/२१/२०२४ ०१:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: