इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स आणि ललित कला केंद्र तर्फे आयोजन
पुणे: इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स (आयसीसीआर) पुणे उपक्षेत्रीय कार्यालय आणि ललित कला केंद्र (सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) यांच्या संयुक्त विद्यमाने डॉ. माधुरी मजुमदार यांचे कुचिपुडी नृत्य आणि डॉ.धनंजय दैठणकर यांचे संतूर वादन यांचा समावेश असलेली सांस्कृतिक संध्या आयोजित करण्यात आली होती. या कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला.ही सांस्कृतिक संध्या दि.२६ जुलै २०२४ रोजी संध्याकाळी ५ वाजता संत नामदेव सभागृह(सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ) येथे आयोजित करण्यात आली होती.ही सांस्कृतिक संध्या इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्सच्या 'होरायझन' या मालिकेअंतर्गत आयोजित करण्यात आली .इंडियन कौन्सिल फॉर कल्चरल रिलेशन्स,पुणे उपक्षेत्रीय कार्यालयाचे उपसंचालक श्री.राज कुमार यांनी कलाकारांचे स्वागत केले.
गणेश कौतुम या नृत्य प्रकाराने मजुमदार यांनी कथक नृत्याचा प्रारंभ केला. त्यांच्या शिष्यांनी पलुकुते हे स्तवन, शिव स्तुती सादर केले, या सादरीकरणाला चांगला प्रतिसाद मिळाला. मजुमदार यांना हीरक शहा, गौरव दास यांनी साथ संगत केली.
डॉ. धनंजय दैठणकर यांच्या संतूर सादरीकरणाने उपस्थित मोहून गेले.दैठणकर यांना निनाद दैठणकर, रोहित मुजुमदार यांनी साथ संगत केली. डॉ. दैठणकर यांनी राग हंसध्वनी, आलाप, विलंबित बंदिश पेश केली.प्रा. परिमल फडके, संजिवनी स्वामी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.तेजदिप्ती पावडे यांनी सूत्रसंचालन केले.सर्वांसाठी प्रवेश विनामूल्य होता.
Reviewed by ANN news network
on
७/२८/२०२४ ११:३०:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: