भारतीय विद्या भवन,इन्फोसिस फाऊंडेशनचा सांस्कृतिक प्रसार उपक्रम
पुणे ः भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार उपक्रमांतर्गत आयोजित 'क्षण पावसाचे ' या सांगीतिक कार्यक्रमाला चांगला प्रतिसाद मिळाला. शनीवार,२० जुलै रोजी सायंकाळी सहा वाजता भारतीय विद्या भवनचे सरदार महादेव बळवंत नातू सभागृह,(सेनापती बापट रस्ता) येथे आयोजित करण्यात आला होता .
गोल्डन मेमरीची प्रस्तुती असलेला क्षण पावसाचे या कार्यक्रमाची संकल्पना आणि निर्मिती चैत्राली अभ्यंकर यांची होती आणि संहिता लेखन अक्षय वाटवे यांनी केले होते. प्रत्येकाच्या मनातला पाऊस आठवत त्याविषयी गप्पा गाणी कविता आणि आठवणी यांचा सादरीकरण कार्यक्रमातल्या कलाकारांनी केले. यामध्ये दिग्गज कवी बा.भ.बोरकर मंगेश पाडगावकर .बालकवी ठोंबरे,अरुणा ढेरे,इंदिरा संत,कवी अनिल,शंकर वैद्य यांच्या उत्तम उत्तम कविता सादर केल्या गेल्या. त्याचप्रमाणे 'श्रावणात घननिळा', 'झिमझिम झरति श्रावणधारा', 'अंगणी माझ्या मनाच्या', 'पाऊस पहिला जणू कान्होला', 'घन ओथंबून येती', 'नभ उतरू आलं' यासारखी लोकप्रिय गाणी सादर केली. मंगेश पाडगावकर यांच्या पावसावरचे बालगीत 'सांग सांग भोलानाथ' तसेच माडगूळकरांनी लिहिलेलं 'नाच रे मोरा ' या गाण्यानं सांगता झाली. 'ऋतू हिरवा' आणि 'धन धन माला नभी दाटल्या' या दोन्ही अजरामर अशा गीतांवरती धनश्री पोद्दार आणि त्यांच्या विद्यार्थिनींनी अतिशय उत्कृष्ट नृत्यांचे सादरीकरण केले.
मीनल पोंक्षे (गायन),तुषार दीक्षित(की बोर्ड),राजेंद्र हसबनीस (तबला),संजय खाडे(ऑकटोपॅड) यांनी साथसंगत केली.
भारतीय विद्या भवन आणि इन्फोसिस फाऊंडेशनच्या सांस्कृतिक प्रसार कार्यक्रमांतर्गत सादर होणारा हा २१९ वा कार्यक्रम होता. भारतीय विद्या भवनचे मानद सचिव प्रा.नंदकुमार काकिर्डे यांनी कलाकारांचा सत्कार केला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: