बेहिशेबी मालमत्ता जमवल्याची तक्रार
पुणे : पुण्यामध्ये पूर्वी शिक्षण उपसंचालक पदावर काम केलेल्या आणि सध्या नंदुरबार येथे माध्यमिक शिक्षण अधिकारी वर्ग १ या पदावर कार्यरत असलेल्या प्रवीण वसंत अहिरे (वय ४६) आणि त्यांची पत्नी स्मिता प्रविण अहिरे (वय ४१) यांच्यावर अॅन्टीकरप्शन खात्याने ४ जुलै रोजी पुण्यातील बंडगार्डन पोलीसठाण्यात तक्रार दाखल केली आहे.अॅन्टीकरप्शन खात्याचे निरीक्षक रुपेश जाधव यांनी ही तक्रार दिली आहे.
प्रवीण अहिरे यांनी बेहिशेबी मालमत्ता जमविल्याच्या संशयावरून अॅन्टीकरप्शन खात्याच्या पुणे कार्यालयाने त्यांची चौकशी केली. या चौकशीत अहिरे आणि त्यांची पत्नी यांच्याकडे ३१ लाख ७८ हजार २०० रुपये बेहिशेबी मालमत्ता आढळून आली. ती कशी आली याबाबत म्हणणे मांडण्यासाठी अॅन्टीकरप्शन खात्याच्या अधिकार्यांनी वारंवार अहिरे दाम्पत्याला संधी दिली. मात्र, त्यांना समाधानकारक स्पष्टीकरण देता न आल्याने त्यांच्यावर बंडगार्डन पोलीस ठाण्यात भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम १३ (१) (इ), १३ (२), सह भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, (सुधारीत अधिनियम सन २०१८ ) चे कलम १३ (१) (ब), १३ (२) सह भा.दं.वि. कलम १०९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पुढील तपास पुणे अॅन्टीकरप्शनचे निरीक्षक प्रवीण निंबाळकर करीत आहेत.
शिक्षणखात्यातील उच्चपदस्थ अधिकार्यासह त्याच्या पत्नीवर गुन्हा दाखल!
Reviewed by ANN news network
on
७/०५/२०२४ ०५:२३:०० PM
Rating:
Reviewed by ANN news network
on
७/०५/२०२४ ०५:२३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: