खेड तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला २० हजार रुपये लाच घेताना पकडले!


पुणे : पुणे जिल्ह्यातील राजगुरुनगर, खेड तहसील कार्यालयातील अव्वल  कारकुनाला ३ जुलै रोजी २० हजार रुपयांची लाच घेताना अ‍ॅन्टीकरप्शन खात्याच्या पथकाने पकडले.

रमेश ज्योतीराम वाल्मिकी, (वय ५१) असे या अव्वल कारकुनाचे नाव आहे. या प्रकरणी त्यांच्याविरोधात खेड पोलीसठाणे, पुणे येथे भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम, सन १९८८ चे कलम ७, ७ अ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाल्मिकी यांच्याविरोधात एका ३२ वर्षांच्या तरुणाने तक्रार दिली आहे. त्याने खेड तालुक्यातील तुकडेबंदी खाली येणारी जमीन खरेदी केली होती. याची नोंद सातबारावर होण्याकरिता नोंदणी आदेश मिळावा म्हणून त्याने खेड तहसील कार्यालयात रीतसर अर्ज केला होता. वाल्मिकी यांनी हे काम करण्यासाठी तक्रारदाराकडे ५० हजार रुपये लाच मागितली. त्यानंतर तक्रारदाराने अ‍ॅन्टीकरप्शनकडे तक्रार दिली. अ‍ॅन्टीकरप्शनचे पथक पडताळणी करत असताना वाल्मिकी यांनी तडजोडीअंती २० हजार रुपये लाच घेण्याचे मान्य केले. यानंतर पथकाने सापळा रचला आणि खेड तहसील कार्यालयाच्या आवारात वाल्मिकी यांना २० हजार रुपये लाच घेताना पकडले.

निरीक्षक प्रसाद लोणारे पुढील तपास करत आहेत.

ही कारवाई  पोलीस अधीक्षक  अमोल तांबे,  अपर अधीक्षक डॉ. शीतल जानवे यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने केली.
खेड तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला २० हजार रुपये लाच घेताना पकडले!  खेड तहसील कार्यालयातील अव्वल कारकुनाला २० हजार रुपये लाच घेताना पकडले! Reviewed by ANN news network on ७/०५/२०२४ ०५:२२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".