पिंपरी : पिंपरी चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील जिजामाता रुग्णालयात मोठा आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप काॅंग्रेसच्या महिला शहराध्यक्षा सायली नढे यांनी नुकताच केला होता. महापालिकेचे प्रशासन या गैरव्यवहारावर पांघरूण घालून दोषींना वाचवू पहात आहे असेही त्यांनी म्हटले होते. या थेट आणि गंभीर आरोपांमुळे खडबडून जाग आलेल्या पालिका आयुक्तांनी या प्रकरणी लेखापरीक्षणाचे आदेश दिले आहेत.
सायली नढे यांनी जिजामाता रुग्णालयात १ मार्च ते ३० एप्रिल या काळात केसपेपर आणि अन्य शुल्कापोटी १८ लाख ६६ हजार ३५६ रुपये जमा झाले होते. या पैकी फक्त ८ लाख ८९ हजार ६६५ रुपये पालिकेच्या बँक खात्यात भरणा करण्यात आले उर्वरित १० लाख रुपये रुग्णालयातील अधिकारी, कर्मचार्यांनी संगनमताने हडप केले असा आरोप केला होता. हे प्रकरण महापालिका प्रशासन दडपण्याचा प्रयत्न करत असल्याचे म्हटले होते.
विधीमंडळाचे अधिवेशन सुरू असल्याने या गैरव्यवहाराचे पडसाद तेथे उमटल्यास पालिका प्रशासनाला पळता भुई थोडी होईल याची जाणीव झाल्याने आयुक्तांनी या प्रकरणी लेखापरीक्षण करण्याचे आदेश दिल्याचे बोलले जात आहे.
Reviewed by ANN news network
on
७/०५/२०२४ ०५:२५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: