पिंपरी : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या 29 जुलै रोजी लवळे येथील सिम्बॉयसिस विद्यापीठाच्या भेटीमुळे, या परिसरातील वाहतूक व्यवस्थेत काही बदल करण्यात आले आहेत. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी, पिंपरी चिंचवड वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड यांनी या बदलांची घोषणा केली आहे.
मुख्य वाहतूक मार्गांवरील बदल:
मौजे नांदेगाव, सनीजवर्ल्ड, आणि सुस मार्गे पुणे या मार्गांवर सर्व प्रकारच्या हलकी, जड आणि अवजड वाहनांची वाहतूक बंद करण्यात आली आहे. याऐवजी, वाहतूक नांदेगाव-माले मार्गे हिंजवडी आणि नांदेगाव-पिरंगुट-चांदणी चौक मार्गे पुणे असे वळवण्यात आले आहे.
या बदलांमुळे नागरिकांनी आपल्या प्रवासाचे नियोजन योग्य प्रकारे करावे आणि दिलेल्या निर्देशांचे पालन करावे, अशी विनंती करण्यात आली आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान कोणत्याही प्रकारची अडचण निर्माण होऊ नये म्हणून या बदलांची अंमलबजावणी करण्यात येत आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: