मुंबई: शिळफाटा येथील मंदिरात आश्रय घेणाऱ्या एका महिलेवर सामूहिक अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या प्रकरणाचा तपास जलदगतीने पूर्ण करून दोषींना कठोर शिक्षा मिळावी, म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ठाणे व नवी मुंबई पोलीस आयुक्त, तसेच गृह विभागाचे प्रधान सचिव यांना तात्काळ खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालविण्याच्या सूचना दिल्या आहेत. याबरोबरच, प्रख्यात विधीज्ञ उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकिल म्हणून नियुक्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
घटना अत्यंत गंभीर असून, शिळफाटा येथील ठाणे पोलीस ठाण्यात आणि महिलेच्या आई-वडिलांच्या तक्रारीवरून नवी मुंबई पोलीस ठाण्यात ४९८ ए कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी तपास जलदगतीने आणि प्रभावीपणे करण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मुख्यमंत्री शिंदे यांनी याप्रकरणातील दोषींना कठोर शिक्षा मिळावी यासाठी तत्पर कार्यवाही होईल याची खात्री दिली आहे. त्यांनी ठाणे आणि नवी मुंबई पोलीस आयुक्तांना विशेष सरकारी वकिल म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याच्या निर्देश दिले आहेत.
या घटनेने समाजात तीव्र संताप निर्माण केला आहे, आणि मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयामुळे आरोपींना कठोर शिक्षा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
काय आहे प्रकरण
नवी मुंबईतील बेलापूर येथील ३० वर्षीय अक्षता म्हात्रे ही महिला ६ जुलै रोजी सकाळी ६ वाजता, पती आणि सासूशी झालेल्या भांडणानंतर घर सोडून गेली. “सहसा ती प्रत्येक शनिवारी बेलापूर गावातील मंदिरात जात असे, पण त्या दिवशी तिने शिळफाटा येथील घोल गणपती मंदिरात जाण्याचा निर्णय घेतला. टेकडीवरील या मंदिराच्या शांत आणि निसर्गरम्य वातावरणामुळे तिला तिथे शांतता मिळेल असे वाटले असावे. पीडित महिलेच्या वडिलांनी सांगितले की, ती आपल्या मैत्रिणींसह कधी कधी या मंदिरात जात असे आणि तिथे ती शांतता अनुभवत असे, मंदिरात पोहोचल्यावर तिने संपूर्ण दिवस तिथे घालवला.
मंदिरातील पुजारी संतोषकुमार रामयग्न मिश्रा (४५) राजकुमार रामफेर पांडे (५४) शमसुंदर प्यारचंद शर्मा (६२) हा अणु संशोधन केंद्राचे (BARC) निवृत्त कर्मचारी यांनी तिला सहानुभूती दाखवत चहामध्ये भांग मिसळून तिला चहा दिला. ती बेशुद्ध झाल्यावर तिला स्टोअररूममध्ये नेऊन या तिघांनी तिच्यावर बलात्कार केला.काही तासांनंतर, तिला शुद्ध आली आणि काय घडले हे लक्षात आल्यावर ती ओरडू लागली. त्यामुळे आरोपींनी तिचा डोक्याला जबर मारून आणि गळा आवळून खून केला. तिचा मृतदेह या तिघांनी जवळच असलेल्या दरीसदृष्य ठिकाणी फेकून दिला. ९ जुलै रोजी तो मंदिरात येणार्या एका भक्ताने पाहिला आणि पोलिसांना खबर दिली.
पोलिसांनी तातडीने आणि शिताफीने तपास करत मिश्रा आणि पांडे यांना मंदिरातूनच अटक करण्यात केली, तर शर्मा फरार झाला होता. त्याला ट्रॉम्बे येथून अटक करण्यात आली. आरोपींवर हत्या,गँगरेप आणि पुरावे नष्ट करणे या कलमांतर्फत गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात लक्ष घातले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: