चोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद


मुंबई: पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीत कारची काच तोडून बॅग चोरी करणाऱ्या आंतरराज्य टोळीला पेल्हार गुन्हे प्रकटीकरण शाखेने अटक केली आहे. दिनांक १ जुलै २०२४ रोजी दुपारी धानीव बाग, नालासोपारा पूर्व येथील मारुती सुझुकी शोरूमसमोर उभ्या केलेल्या महिंद्रा स्कॉर्पिओ कारमधून लेदरची बॅग आणि रोख रक्कम चोरीला गेली होती. या घटनेनंतर फिर्यादीने पेल्हार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविला होता.

गुन्ह्याचा तपास आणि आरोपींची अटक

पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेने तपासाला सुरुवात केली. घटनास्थळावरच्या सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून आरोपींनी कारची काच गलोल व लोखंडी छर्‍याने तोडून बॅग चोरी केल्याचे उघड झाले. सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे, पेल्हार पोलीसांनी तपास करून आरोपींचा शोध घेतला.

दिनांक १० जुलै २०२४ रोजी आरोपी नालासोपारा पूर्व येथील सोपारा फाटा येथे येणार असल्याची माहिती मिळाल्यानंतर पेल्हार पोलीसांनी सापळा रचून आरोपींना अटक केली.

1. कार्तिक बाळू नायडू (वय २३, गुलाबनगर, वापी, गुजरात)

2. रामू पावनआसम तुट्टीनायकर (वय ४०, गुलाबनगर, वापी, गुजरात)

3. सुब्रमनी रामू नायडू (वय ५०, गुलाबनगर, वापी, गुजरात)

4. एक विधीसंघर्षीत बालक

हे अटक केलेले आरोपी आहेत

गुन्ह्यातील मालमत्ता हस्तगत

आरोपींकडून चोरीस गेलेली रोख रक्कम, कागदपत्रे, आणि गुन्हा करण्यासाठी वापरलेली गलोल , छरे व लहान चाकू हस्तगत करण्यात आले आहेत. एकूण २० हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

आरोपींवरील अन्य गुन्हे

सदर आरोपींच्या विरोधात मध्यप्रदेश व गुजरात राज्यातही गुन्हे दाखल आहेत. त्यांनी काशीमिरा, मिरारोड, वसई येथे देखील गुन्हे केल्याचे कबूल केले आहे.

यशस्वी तपास पथक

सदर कामगिरी पोलीस उप आयुक्त जयंत भजबळे, सहायक आयुक्त बजरंग देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ  निरीक्षक जितेंद्र वनकोटी, कुमारगौरव धादवड, शकील शेख, आणि गुन्हे प्रकटीकरण शाखेचे अधिकारी व अंमलदार यांनी यशस्वीरित्या पार पडली. 

ह्या कारवाईमुळे पेल्हार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील अशा प्रकारच्या गुन्ह्यांवर अंकुश लावण्यास मोठी मदत झाली आहे. 

चोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद चोरांची आंतरराज्य टोळी जेरबंद Reviewed by ANN news network on ७/१७/२०२४ ०३:४०:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".