महापालिका निवडणुकीत परिणाम जाणवणार?
पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर राष्ट्रवादी काँगेसमध्ये गेले काही दिवस सुरू असलेले राजकीय वादळ आज शमले. मात्र, या वादळाने अजित पवार गटाची मोठी हानी झाली आहे. ज्या अजित गव्हाणेंच्या हाती मोठ्या विश्वासाने अजित पवार यांनी शहर संघटनेच्या अध्यक्षपदाचे सुकाणू सोपविले होते त्यांनीच शहर राष्ट्रवादीच्या नौकेचे कप्तानपद सोडल्याने अजित पवार यांच्या गटाची स्थिती शहरात मोठी बिकट झाली आहे.
...यांनी अजित पवार यांना केला बायबाय
आज शरद पवार गटात प्रवेश केलेल्यांमध्ये माजी महापौर हनुमंत भोसले, वैशाली घोडेकर, माजी नगरसेवक राहुल भोसले, समीर मासुळकर, पंकज भालेकर, प्रवीण भालेकर, संगीता ताम्हाणे, संजय नेवाळे,वसंत बोराटे,विजया तापकीर,गीता मंचरकर,संजय वाबळे, वैशाली उबाळे, अनुराधा गोफणे, घनश्याम खेडेकर,तानाजी खाडे,शशिकीरण गवळी, शुभांगी बोराडे, विनया तापकीर,दिवंगत नगरसेविका पौर्णिमा सोनवणे यांचे पती रवी सोनवणे, दिवंगत नगरसेवक दत्ता साने यांचे पुत्र यश साने, सागर बोराटे, मामा शिंदे, विशाल आहेर,युवराज पवार, नंदू शिंदे, शरद भालेकर यांचा समावेश आहे.
या पैकी सुमारे ११ ते १२ जणांचा त्यांच्या भागामध्ये चांगलाच प्रभाव आहे. ते पक्षाऐवजी स्वतःच्या ताकदीवर महापालिका निवडणुकीत निवडून येऊ शकतात. त्यामुळे महापालिका निवडणुकीच्या गणितावर याचा मोठा परिणाम होऊ शकतो.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: