मुंबई : पायधुणी पोलीसठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ३३ वर्षांपासून फरार असलेल्या एका आरोपीला पुण्यातील मुंढवा परिसरातून अटक करण्यात यश मिळविले आहे.
पवन गोपीकृष्ण मोदी,राहणार खार, मुंबई असे या आरोपीचे नाव आहे. त्याच्यावर पायधुणी पोलीसठाण्यात ४१५/१९९० क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४२० अन्यये गुन्हा दाखल होता. या प्रकरणी त्याच्यावर अतिरिक्त मुख्य महानगर दंडाधिकारी, २ रे न्यायालय, माझगाव. मुंबई यांच्या न्यायालयात क्र. ९५०/पी/१९९१ अन्वये खटला चालू आहे. या खटल्याच्या सुनावणीच्या वेळी उपस्थित राहण्याऐवजी तो १९९१ साला पासून गैरहजर होता. न्यायालयाने त्याला फरार घोषित केले होते. तो सतत राहण्याची ठिकाणे बदलत असल्याने त्याचा शोध घेणे कठीण झाले होते.परंतु, पायधुणी पोलीस ठाण्याचे गुन्हे प्रकटीकरण अधिकारी उप निरीक्षक अनिल वायाळ व त्यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करुन हा फरारी आरोपी हा पुणे येथील मुंढवा परीसरात राहत असल्याची माहीती प्राप्त करुन आज रोजी त्यास मुंढवा परीसरातून शिताफीने ताब्यात घेतले आणि पायधुनी पोलीस ठाणे येथे आणून फेरअटक केली. आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
ही कारवाई अपर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख, उपआयुक्त, परिमंडळ - २, डॉ मोहितकुमार गर्ग, सहाय्यक आयुक्त पायधुणी विभाग ज्योत्सना रासम, पायधुणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक, बाळकृष्ण देशमुख, निरीक्षक (गुन्हे) नितीन पगार यांच्या मार्गदशनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाचे उपनिरीक्षक अनिल वायाळ, हवालदार कैलास भोईटे, इरफान खान, दिपक निकम, शिपाई शंकर राठोड, प्रकाश अलदर नितेश घोडे यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: