पनवेलनजिक द्रुतगती मार्गावर बसची ट्रॅक्टरला धडक; पाच जणांचा मृत्यू, सात गंभीर



पनवेल : पनवेलपासून साडेपाच किलोमीटर अंतरावर मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अंधारात चाललेला ट्रॅक्टर न दिसल्याने एका खासगी बसने ट्रॅक्टरला धडक दिली. त्यामुळे बसवरील चालकाचे नियंत्रण सुटले आणि बस २० फूट खोल खड्ड्यात कोसळली या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला. ही घटना काल रात्री एक वाजण्याच्या सुमारास घडली. बसमध्ये एकंदर ४४  प्रवासी होते. ते आषाढी एकादशीनिमित्त डोंबिवलीहून पंढरपूरकडे निघाले होते.

मिळालेल्या माहितीनुसार गुरुनाथ बापू पाटील, रामदास नारायण मुकादम, होसाबाई पाटील तसेच ट्रॅक्टरमधील दोन पुरुष यांचे मृतदेह सापडले आहेत, त्यांची ओळख पटलेली नाही.सात गंभीर जखमींवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असून बाकी ४२ जखमींना पनवेलच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. 

मृत प्रवासी डोंबिवलीनजिकच्या केसर गावातील असल्याची माहिती मिळत आहे. डोंबिवलीमधील दोन ते तीन गावामधून चार बस पंढरपूरकडे निघाल्या होत्या. त्यातील एक बसच्या पुढे ट्रॅक्टर जात होता. अंधारात ट्रॅक्टर न दिसल्याने बसने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली आणि बस २० फूट खाली कोसळली.

अपघाताची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्य सुरु केले.

नवी मुंबईचे डीसीपीही घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी मदतकार्याची जातीने पाहणी केली.



पनवेलनजिक द्रुतगती मार्गावर बसची ट्रॅक्टरला धडक; पाच जणांचा मृत्यू, सात गंभीर  पनवेलनजिक द्रुतगती मार्गावर बसची ट्रॅक्टरला धडक; पाच जणांचा मृत्यू, सात गंभीर Reviewed by ANN news network on ७/१६/२०२४ १०:४८:०० AM Rating: 5

२ टिप्पण्या:

  1. खरंतर प्रत्येक चालकाची ही जबाबदारी आहे की आपण जेव्हा द्रुतगती मार्गवरून जातोय तेव्हा आपल्या बसच्या हेडलाईट चालू असायला हव्यात.
    इथे दुसरा प्रश्न उपस्थित होतो की तो ट्रॅक्टर द्रुतगती मार्गावर आला कसा?
    ट्रॅक्टर द्रुतगती मार्गावर येऊ नये यासाठी वेळोवेळी सूचना करून सुद्धा अशी घटना घडते ही खेदजनक गोष्ट आहे

    उत्तर द्याहटवा
  2. अशा घटना घडूच नयेत म्हणून ट्रॅक्टर चालकांनी द्रुत गती मार्गावर आल्यावर त्यांना दंडात्मक कारवाई करायला हवी

    उत्तर द्याहटवा

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".