पिंपरी चिंचवड: शहरातील नागरिकांची गैरसोय गंभीर बनली आहे कारण पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या (मनपा) कार्यालयात गेल्या महिन्याभरापासून जन्म-मृत्यू दाखल्यांचे काम ठप्प आहे. नागरिकांना आवश्यक कागदपत्रे मिळवण्यासाठी मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे.या प्रकरणी आयुक्तांनी त्वरित लक्ष घालून योग्य त्या कार्यवाहीचे आदेश द्यावेत अशी मागणी पालिकेतील माजी विरोधीपक्ष नेता नाना काटे यांनी केली आहे.
काटे यांनी आयुक्तांना निवेदन दिले असून त्यात म्हटले आहे की, पूर्वीच्या सॉफ्टवेअरमुळे सहज उपलब्ध असणारे जन्म-मृत्यू दाखले देणे आता बंद झाले आहे. नवीन अत्याधुनिक सॉफ्टवेअर १५ दिवसांपूर्वी स्थापित करण्यात आले आहे, परंतु अद्याप ते कार्यान्वित झालेले नाही. संबंधित कर्मचारी वर्गाला या नवीन सॉफ्टवेअरचे प्रशिक्षण देखील दिले गेलेले नाही.
नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आणि शैक्षणिक प्रवेशासाठी जन्म-मृत्यू दाखल्यांची आवश्यकता आहे. तरीही, मनपा कार्यालयात अनेक चकरा मारूनही नागरिकांना "सॉफ्टवेअर चालू नाही" असे उत्तर मिळते.
या परिस्थितीत आयुक्तांनी त्वरित लक्ष देऊन नागरिकांना होणारी गैरसोय थांबवावी. नागरिकांना आवश्यक दाखले लवकरात लवकर उपलब्ध करून देण्याची व्यवस्था करावी. तसेच, संबंधित कर्मचार्यांना नवीन सॉफ्टवेअरचे योग्य प्रशिक्षण दिले जावे. त्यामुळे शहरातील नागरिकांना त्रासातून मुक्ती मिळावी.
Reviewed by ANN news network
on
७/०७/२०२४ १०:२४:०० AM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: