पुणे : पुणे जिल्ह्यातील कदमवाकवस्ती येथील दहावीमध्ये शिकणाऱ्या मुलाने १५ जुलै रोजी सकाळी आठच्या सुमारास राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
गोविंद सतीश रुपनावर, (वय -16, रा. संभाजीनगर, कदमवाकवस्ती, ता. हवेली, मूळ रा. लातूर), असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. याप्रकरणी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, गोविंदचे वडील वाहनचालक आहेत. मृत मुलाचे कुटुंब एक महिन्यांपूर्वीच लातूर येथून कदमवाकवस्ती येथे राहण्यासाठी आले आहे. मृत गोविंद याने नुकताच लोणी काळभोर येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूलमध्ये इयत्ता दहावीत प्रवेश घेतला होता.
रविवारी रात्री त्याच परिसरात रहात असलेल्या नातेवाईकांकडे गोविंद, त्याची आई व बहीण गेले होते. रात्री साडेनऊच्या सुमारस गोविंद मला अभ्यास करायचा आहे, मी घरी जातो असे सांगून तेथून निघून घरी गेला.
रात्री त्याची आई व बहीण घरी परतल्यानंतर त्यांनी वारंवार दरवाजा वाजवूनही गोविंदने दरवाजा उघडला नाही. कदाचित झोपेत असेल असे समजून त्या दोघी परत त्या नातेवाईकाच्या घरी जाऊन झोपल्या. सकाळी त्या घरी परतल्या असता दरवाजा न उघडल्याने दरवाजा तोडला असता गोविंद याने गळफास लावून घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.
शेजार्यांच्या मदतीने त्याला रुग्णालयात नेल. मात्र, डॉक्टरांनी तो मृत झाल्याचे घोषित केले. त्याने हे टोकाचे पाऊल का उचलले ते अद्याप समजलेले नाही. लोणी काळभोर पोलीस अधिक तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: