मुंबई : रायगड जिल्ह्यातील अलिबाग कडून पनवेलकडे जाणारी एस.टी. बस उलटल्याने ४ प्रवासी जखमी झाले आहेत. पोयनाड परिसरातील कार्लेखिंड येथे हा अपघात झाला.
अपघात झाला त्यावेळी बसमध्ये ५० प्रवासी होते. अॅक्सल तुटल्याने बस अनियंत्रित झाली आणि रस्त्याच्या कडेला जाऊन उलटली. अपघाताची माहिती मिळताच पोयनाड पोलीसठाण्याचे अधिकारी आणि एसटीचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले.
जखमींना उपचारासाठी नजिकच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या अपघातामुळे काही काळ या मार्गावरील वाहतूक खोळंबली होती. ती पूर्ववत झाली आहे.
एसटी बस उलटली; ४ प्रवासी जखमी
Reviewed by ANN news network
on
७/१५/२०२४ ०२:२२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: