पुणे : 'कर्नाटकात डिझेल आणि पेट्रोल दरवाढ झाल्याने काँग्रेसचा खोटारडेपणा उघडकीस आला आहे.काँग्रेसच्या राज्यात स्वस्ताई येईल असे आश्वासन त्यांच्याकडून नेहमी दिले जाते,ते कधीच पाळले जात नाही'असा आरोप भाजप प्रवक्ते अली दारूवाला यांनी केला आहे.आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात त्यांनी हा आरोप केला आहे.
काँग्रेसचा प्रचार आणि वास्तवातील वागणे या दोन परस्परविरोधी बाबी आहेत हे या निमित्ताने सिद्ध झाले आहे.लोकसभा निवडणूक पार पडली आणि वास्तव मतदारांसमोर आले. कर्नाटकातील नागरिकांना आधी जास्त वीज शुल्क भरावे लागत होते आणि आता भाजपची सत्ता असलेल्या महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशच्या तुलनेत पेट्रोल आणि डिझेलवर 3 रुपये जास्त आहेत. काँग्रेसने भारतीयांना बरेच काही मोफत देण्याचे आश्वासन दिले होते .दारिद्र्यरेषेखालील सर्व महिलांना मासिक 8500 रुपये निधी कोठून देणार याचा उल्लेख केला नव्हता.एका मतदाराच्या खिशातून पैसे काढल्याशिवाय दुसऱ्या मतदाराला मोफत देता येत नाही,हे वास्तव आहे. काँग्रेस काहीही मोफत देत नाही आणि त्याबाबत खोटारडेपणा करीत असते,त्यामुळे मतदारांनी जागरूक राहिले पाहिजे ,असेही अली दारूवाला यांनी या पत्रकात म्हटले आहे.
काँग्रेस खोटारडेपणा करीत आहे :अली दारूवाला यांचा आरोप
Reviewed by ANN news network
on
६/१७/२०२४ ०२:५२:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: