उत्तर महाराष्ट्रातील धुळे शहरात वाढलेल्या हर्षलने अमेरिका येथील द न्यू स्कूल महाविद्यालयातून फिल्म आणि मीडिया प्रॉडक्शन या विषयात २०२० साली मास्टर ऑफ आर्ट्स ही पदवी मिळवली. पुढील तीन वर्षे हर्षलने न्यू यॉर्कच्या प्रसिद्ध फिल्म आणि कला संस्था, उदाहरणार्थ फिल्म एट लिंकन सेंटर, ला मामा प्रायोगिक रंगमंच, ब्रुकलिन संग्रहालय, इ. साठी विविध शैलीतील व्हिडिओ प्रॉडक्शनचे संचालन केले. फिल्म जगतात हर्षल आपल्या उपनाम हर्ष पंडित या नावाने देखील ओळखले जातात.
यापूर्वीही हर्षलची प्रायोगिक शॉर्ट फिल्म 'एलीमेंटल' (भौतिकी) न्यू यॉर्कच्या प्रतिष्ठित सिनेमागृह फिल्म फोरमच्या 'लॉबी मूवीज' श्रृंखलेत प्रदर्शित करण्यात आली होती. या फिल्म श्रृंखलेत सिंडी शर्मन, केली राईकहार्ट, बिल मॉरिसन, पेनी लेन यांसारख्या अनेक आंतरराष्ट्रीय ख्यातीच्या फिल्म निर्मात्यांच्याही फिल्म्स प्रदर्शित झाल्या आहेत. 'एलीमेंटल' या फिल्मची खासियत म्हणजे यात कोणत्याही संगीत किंवा संवादाचा वापर केलेला नाही आणि ना कुणा व्यक्तीला दाखवले आहे. हर्षच्या वेबसाइटवर, जिथे 'एलीमेंटल' पाहण्यासाठी उपलब्ध आहे, तिथे याचे वर्णन 'आर्किटेक्चरल' (वास्तुशिल्पीय) फिल्म म्हणून केले आहे, आणि या फिल्ममध्ये फक्त इमारती आणि निसर्ग विविध रंगांमध्ये दाखवले गेले आहेत.
हर्षलच्या अनेक फिल्म्स पूर्वीही जगभरातील प्रतिष्ठित फिल्म महोत्सवांमध्ये प्रदर्शित झाल्या आहेत. हर्षल सध्या भारतीय प्रशासनाच्या राष्ट्रीय फिल्म विकास निगम लिमिटेड (एन.एफ.डी.सी.) मध्ये संचालक पदावर कार्यरत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: