रेल्वेप्रवाशांना कितपत सुविधा मिळतात याची पाहणी करण्यासाठी पुणे विभागाच्या अधिकाऱ्यांनी केला रेल्वेप्रवास
पुणे: पुणे विभागाच्या विभागीय रेल्वे व्यवस्थापक श्रीमती इन्दू दुबे यांच्या सूचनेनुसार, सहायक विभागीय यांत्रिक इंजीनियर (कैरेज एंड वैगन) श्री प्रतिक तितरे यांनी आज रोजी गाडी क्रमांक 11077 पुणे - जम्मूतावी झेलम एक्सप्रेसच्या इंजिनमध्ये पुणे ते अहमदनगर दरम्यान गाडीच्या वक्तशीरपणाचे रिअल-टाइम निरीक्षण करण्यासाठी फूटप्लेटिंग केले.
श्री तितरे यांनी झेलम एक्सप्रेसच्या प्रवाशांचे अनुभवही जाणून घेतले. प्रवाशांच्या तक्रारी समजून घेऊन सेवांमध्ये सुधारणा करण्यासाठी याचा सविस्तर अहवाल तयार करून विश्लेषण करण्यात येणार आहे. या मोहिमेचा मुख्य उद्देश प्रवाशांच्या तक्रारी कमी करणे आणि त्यांना समाधान देणे आहे.
तपासणीदरम्यान, अधिकारी रेल्वेतील प्रवाशांना लिननचा वेळेवर पुरवठा, लिननची पुरेशी उपलब्धता, बर्थ, स्वच्छतागृहे, वॉश बेसिन आदी ठिकाणी स्वच्छता तपासली. तसेच, मोबाईल चार्जिंग पॉईंट्स, पंखे आणि दिवे व्यवस्थित काम करत आहेत का याचीही तपासणी करण्यात आली.
प्रवाशांना गाडीमधील स्वच्छता सेवा, साफसफाईचे वेळापत्रक, आणि डब्यातील क्विक रिस्पॉन्स क्रमांकांची माहिती देण्यात आली. तसेच, गाडीत आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास अग्निशमन उपकरणांचे वापर कसा करायचा याबद्दल पॅन्ट्री कार कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या. अनधिकृत प्रवाशांना प्रतिबंध करण्यासाठी आरपीएफ कर्मचाऱ्यांना सूचना देण्यात आल्या.
सर्व विभागांचे अधिकारी गाडी निरीक्षण करण्यासाठी तयारीसाठी आहेत आणि प्रवाशांसोबत संवाद साधून थेट फीडबॅक घेतील. या अभिप्रायांच्या आधारे सुविधांमध्ये आवश्यक बदल करण्याचा निर्णय घेता येईल, तसेच भविष्यातील प्रवासामध्ये काही समस्या टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येतील. ज्या समस्या निदर्शनास आल्या त्या प्राथमिक देखभालीत दुरुस्त केल्या जातील, जेणेकरून गाडी पुढच्या प्रवासासाठी तयार असताना प्रवाशांना सुखद प्रवास मिळेल.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: