दिलीप शिंदे
सोयगाव : महाराष्ट्राची लोकवाहिनी व सर्व सामान्यांची लालपरी म्हणून ओळख असलेली राज्य परिवहन महामंडळाची पहिली बस एक जून १९४८ ला रत्यावर धावली त्यामुळे एक जून हा दिवस राज्य परिवहन महामंडळाकडून वर्धापनदिन म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून सोयगाव आगार व बसस्थानकावर १ जून शनिवारी ७६ वा वर्धापनदिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दरम्यान ७६ वा वर्धापनदिना निमित्त सोयगाव बसस्थानक तोरण,फुलांची माळ व रांगोळी काढून सजवण्यात आले होते. तर सोयगाव-नाशिक बस सुद्धा सजविण्यात आली होती. यावेळी सोयगाव येथील जेष्ठ नागरिक कृष्णा आप्पा कुर्लेकर यांच्याहस्ते बस चे पूजन करण्यात आले. बसच्या चालक विनोद पाटील व वाहक राहुल शिरसाठ यांचे औक्षण करण्यात आले. आगार प्रमुख विजय काळवणे यांनी ७६ वा वर्धापनदिना निमित्त प्रवाशांना पुष्प देत पेडा वाटप करीत शुभेच्छा दिल्या.
यावेळी स.ना.वि. कैलास बागुल, वाहतूक नियंत्रक ज्ञानेश्वर वाडेकर, कृष्णा मिसाळ,राहुल ठाकूर, दिनेश विसपुते, आण्णासाहेब ढेपले, रमेश पायघन,अशोक तायडे , वर्जन जाधव,राहुल नागरगोजे, जोहेब तडवी, समाधान जाधव, सतीश पाटील , विनोद जाधव, पत्रकार दिलीप शिंदे,विजय पगारे, योगेश बोखारे, भास्कर श्रीखंडे, समाजसेवक दत्तू रोकडे,पंकज परदेशी, भागवत रोकडे, सोयगाव आगाराचे कर्मचारी आदींसह प्रवाशी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
सोयगाव बस आगारात लालपरीचा ७६ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा...
Reviewed by ANN news network
on
६/०२/२०२४ ०१:४३:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: