दिलीप शिंदे
सोयगाव : तालुक्यातील गोंदेगाव येथे अरबी शिक्षण घेण्यासाठी आलेल्या अल्पवयीन पीडितेला मागे बोलावून विनयभंग करणाऱ्या त्या मौलानाला शुक्रवारी सायंकाळी सात वाजता छत्रपती संभाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले असता. जिल्हा सत्र न्यायालयाने दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
गोंदेगाव ता.सोयगाव येथे अरबी शिक्षण देणारे मौलाना अयूबखान समशेरखान पठाण (वय ५२ रा तिडका ता सोयगाव ह.मु गोंदेगाव ता. सोयगाव) यांचे विरुद्ध अल्पवयीन पीडितेच्या विनयभंग प्रकरणी शुक्रवारी पहाटे चार वाजता पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. त्यास सोयगाव पोलिसांनी अटक करून शुक्रवारी सायंकाळी जिल्हा सत्र न्यायालयात हजर केले त्यास दोन दिवस पोलीस कोठडी सुनावली आहे.
पोलीस निरीक्षक पंकज बारवाल यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक सतीश बडे, रजाक हुसेन,जमादार राजू बर्डे,विकास दुबिले,गजानन दांडगे,दिलीप पवार आदी पुढील तपास करत आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: