एअर इंडियाने प्रवाशांना बुकिंगमध्ये ‘फेअर लॉक’ची सुविधा दिली

 


गुरुग्राम : भारतातील आघाडीची जागतिक विमान कंपनी एअर इंडियाने ग्राहकांसाठी ‘फेअर लॉक’ ही अनोखी सुविधा आणली आहे. airindia.com आणि Air India मोबाइल ॲप्लिकेशनच्या माध्यमातून तिकीट काढणाऱ्या ग्राहकांसाठी हे एक नवीन वैशिष्ट्य आहे, जे प्रवाशांना प्रवासाची अधिक सहज आणि सोयीस्कर आखणी करण्यास मदत करते.

फेअर लॉक या सुविधेअंतर्गत ग्राहक एखादा तिकीट दर निश्चित, नाममात्र शुल्कासाठी 48 तासांसाठी लॉक इन किंवा आरक्षित करू शकतात. या काळात ते त्यांचा प्रवास निश्चित करू शकतात. या सुविधेमुळे ग्राहकांना त्यांच्या प्रवासाचे नियोजन करण्यास मदत होते. कारण तिकीट दर लॉक केल्याने दरवाढीचा फटका टळतो तसेच आपल्याला हव्या असलेल्या फ्लाईटने प्रवासही करता येतो. बुकिंगच्या तारखेपासून किमान 10 दिवस ही सुविधा उपलब्ध आहे.

ही सुविधा घेण्यासाठी एअर इंडियाच्या ग्राहकांना त्यांच्या सर्वाधिक पसंतीचे फ्लाइट पर्याय निवडणे आवश्यक आहे. बुकिंग फ्लोमध्ये फेअर लॉक पर्याय निवडा यासाठी नॉन रिफंडेबल शुल्क भरावे लागेल. ‘मॅनेज बुकिंग' हा पर्याय वापरून ग्राहक आधीच -निवडलेल्या तिकीट दराच्या साहाय्याने त्यांच्या बुकिंगचे कन्फर्मेशन करू शकतात. यासाठी वेबसाइट किंवा मोबाइल ॲप असे दोन्ही पर्याय उपलब्ध आहेत.

फेअर लॉक खालील शुल्कांवर उपलब्ध आहे (करांसह) मार्गानुसार त्यात बदल होतो. हा दर प्रत्येक प्रवासी प्रति तिकीट लागू होते:

फ्लाईटचा प्रकार

भारतातून जाणाऱ्या फ्लाईट्स भारतात येणाऱ्या फ्लाईट्स

भारतातून जाणाऱ्या फ्लाईट्स भारतात येणाऱ्या फ्लाईट्स

देशांतर्गत उड्डाणे

INR 500

INR 500

शॉर्ट-हॉल्ट आंतरराष्ट्रीय

INR 850

USD 10

लांब पल्ल्याची आंतरराष्ट्रीय

INR 1500

USD 18

एअर इंडियाच्या प्रवाशांसाठी असलेल्या सुविधांमध्ये सहाय्यक ऑफरिंगच्या वाढत्या पोर्टफोलिओतील फेअर लॉक हे अनोखे फीचर आहे. ग्राहकांना प्रवासाचा उत्तम अनुभव येण्यासाठी याची रचना केली आहे. यासाठी प्रगत तंत्रज्ञानाचा लाभ घेण्यासोबतच बुकिंग फ्लोमध्ये Amadeus सोबत एकत्र आले आहेत. एअर इंडिया आपल्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करण्याला नेहमीच प्राधान्य देते.

एअर इंडियाने प्रवाशांना बुकिंगमध्ये ‘फेअर लॉक’ची सुविधा दिली एअर इंडियाने प्रवाशांना बुकिंगमध्ये  ‘फेअर लॉक’ची सुविधा दिली Reviewed by ANN news network on ६/०६/२०२४ १२:१२:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".