मुंबई : मुंबईतील चेंबूर परिसरात आज ६ जून रोजी सकाळी साडेसातच्या सुमारास एलपीजी सिलिंडरचा स्फोट होऊन ९ जण भाजले.
ओम लिंबाजीया ९ वर्षे, अजय लिंबाजीया ३३ वर्षे, पूनम लिंबाजीया ३५ वर्षे, मेहक लिंबाजीया ११ वर्षे, ज्योत्स्ना लिंबाजीया ५३ वर्षे, पियुष लिंबाजीया २५ वर्षे, नितीन लिंबाजीया ५ वर्षे, प्रीती लिंबाजिया ३४ वर्षे आणि सुदाम शिरसाट ५५ वर्षे अशी जखमींची नावे आहेत.जखमींवर शासकीय गोवंडी शताब्दी रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर आहे.
अग्निशमन दलाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आग आटोक्यात आणण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या आणि पाण्याचे टँकर कार्यरत होते. साडेआठ वाजेपर्यंत वाजता आग आटोक्यात आणण्यात आली.
मुंबईत एलपीजी सिलेंडर स्फोटात ९ जण जखमी
Reviewed by ANN news network
on
६/०६/२०२४ १२:३५:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: