असे आहे पुण्यातील वाढत्या उन्हाळ्याचे 'पाकिस्तान' कनेक्षन
पुणे : भारतीय हवामान खात्याने पुढील २४ तासात पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यात उष्णतेची लाट येणार असल्याचा अंदाज वर्तविला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असे आवाहन केले आहे.
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानकडून येणार्या उष्ण वार्यांमुळे राज्यातील हवामानात हे प्रतिकूल बदल होत आहेत. नागरिकांना उकाड्याचा सामना करावा लागत आहे.
त्याचबरोबर हवामान खात्याने पुढील २४ तासात पुण्यासह कोल्हापूर, रायगड, रत्नागिरी, सातारा, सिंधुदुर्ग आणि सोलापूर जिल्ह्यात विजेच्या कडकडाटासह, जोरदार वादळी वारे वाहून पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त केला आहे.वादळी वार्यांचा वेग ४० ते ५० किलोमीटर प्रति तास होण्याची शक्यता वर्तविली आहे.
नागरिकांनी काही कारणाने घराबाहेर पडावयाचे झाल्यास काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: