मुंबई : ठाणे जिल्ह्यातील डोंबिवली येथील एका कारखान्यात २३ मे रोजी दुपारी बॉयलरचा स्फोट झाल्याने आग लागली. डोंबिवली एमआयडीसी परिसरातील फेज २ मधील केमिकल फॅक्टरीत ही घटना घडली.
प्राथमिक माहितीनुसार, अंबर केमिकल कंपनीच्या चार बॉयलरचा स्फोट झाला आणि त्यामुळे मोठी आग लागली. आगीमुळे केमिकल असलेले ड्रम फुटू लागले, कारखान्याच्या खिडक्यांच्या काचा फुटल्या.
ही आग आजूबाजूच्या घरांमध्ये पसरली असून त्यांचेही नुकसान झाले आहे. अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचे काम सुरू आहे.
आतापर्यंत या घटनेत कोणतीही जीवितहानी झाल्याचे वृत्त नाही. तथापि, स्फोट आणि आगीत अनेक लोक जखमी झाले असून, त्यापैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे.
अपडेट
या स्फोटात आठ कामगारांचा मृत्यू झला आहे, ६५ कामगार जखमी झाले आहेत.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची दुर्घटनास्थळाला भेट.
डोंबिवली एमआयडीसीतील अतिधोकादायक कंपन्या तात्काळ बंद करण्याची घोषणा.
डोंबिवलीतील धोकादायक रासायनिक कंपन्या ४ जूननंतर शिफ़्ट करणार; उद्योगमंत्री उदय सामंत यांची घोषणा
औद्योगिक क्षेत्रात वारंवार होणारे अपघात हे काळजीचं कारण आहे. निष्काळजीपणा, भ्रष्टाचार, दिरंगाई, चालढकल या कारणांमुळे लोकांच्या जीवाशी खेळ होता कामा नये; आदित्य ठाकरे यांची प्रतिक्रिया

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: