डॉ. संतोष पाटील यांनी वाचविले अनेक पक्षांचे प्राण...
दिलीप शिंदे
सोयगाव : सिल्लोड शहरातील प्रतिथयश व्यापारी बंटी राका व निसर्गप्रेमी मंगेश खंडेलवाल यांना शहरातील टिळक नगर भागात एका ठिकाणी सुस्त पडलेले व अंगावर गाठी आलेले कबुतर दिसले, त्यांनी त्वरित पक्षांवर उपचार करणारे व संशोधक अभिनव प्रतिष्ठान चे डॉ संतोष पाटील यांचे कडे त्यास सुपूर्द केले.डॉ पाटील यांनी त्यावर उपचार करून बरे झालेवर अधिवासात सोडले. भराडी रोडवरील जय ट्रेडर्स जवळ २० ते २५ कबुतरांना हाच आजार असल्याचे राका यांनी पाटील यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर शहरातील व परिसरातील बऱ्याच कबुतरांना हा संसर्ग झालेचे लक्षात येऊन बऱ्याच पक्षांवर उपचार करण्यात आले.
काय आहे एवी पॉक्स विषाणू संसर्ग
कबुतरांच्या त्वचेस व श्लेष्मावरणावर गाठी आणणारा हा डी एन ए विषाणू असून, पक्षांना एकमेकांच्या चोचीस चोच लावणे,पंख ओढणे, त्वचेचा प्रत्यक्ष संपर्क, लाळ,पक्षांना पिसा व डास ,गोचीड चावणे यातून प्रसार होतो.ज्या कबुतरांच्या वसाहतीवर उन्ह पडत नाही त्या ठिकाणी हा संसर्ग जास्त होतो.हा विषाणू उन्हाने लवकर नियंत्रणात येतो.
एवीपॉक्सचा मानवास संसर्ग नाही होतहा एवी पॉक्स व्हायरस डी एन ए विषाणू चा प्रकार असून त्यामुळे कबुतरांना एवीयन पॉक्स नावाचा आजार होत आहे.तो फक्त कबुतरांनाच होतो.पंख विरहित भागांवर विशेषतः चोच, पाय, डोळा,श्वास मार्ग व तोंडात गाठी येतात.एपीथेलीयम पेशी वर याच परिणाम होतो.गिळण्यास व श्वासास त्रास होतो व जर हा संसर्ग रक्तात पसरला तर यकृतास सूज येऊन पक्षी मृत्युमुखी पडतात. काही पक्षांना दृष्टी दोष ही उद्धभवतो.अनेक कबुतरांना वाचविण्यात यश आले आहे- डॉ.संतोष पाटील, जैवविविधता संवर्धक,सिल्लोड
"गुटरगू धोक्यात"; सिल्लोड शहर व परिसरातील कबुतरांना "एवी पॉक्स " विषाणूची बाधा
Reviewed by ANN news network
on
५/१७/२०२४ १०:३१:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: