पाचोरा-फरदापूर खराब झालेल्या बस मधील प्रवाशांची गर्दी
दिलीप शिंदे
सोयगाव : सोयगाव येथील एसटी आगाराच्या नियोजनशून्य कारभारामुळे प्रवासी त्रस्त झाले आहेत. या आगाराचा कारभार वेळीच न सुधारल्यास कधीतरी प्रवाशांच्या संतापाचा उद्रेक होण्याची शक्यता आहे.
राज्य परिवहन महामंडळाच्या पाचोरा आगाराची बस क्रमांक एम.एच.२० बीएल २१९९ पाचोरा-फरदापूर ही बस २३ मे रोजी सकाळी ०८:४५ च्या सुमारास सोयगाव बसस्थानकावर खराब झाली. त्यात फरदापूर येथे जाणारे प्रवासी होते. बस खराब झाल्यामुळे बस मधील प्रवाशांना सोयगाव बसस्थानकावर उतरविण्यात आले.त्याच वेळात चाळीसगाव-बुलढाणा ही चाळीसगाव आगाराची बस सोयगाव बसस्थानकावर आली. बसमध्ये अगोदरच प्रवासी संख्या जास्त असल्याने पाचोरा-फरदापूर बस मधील प्रवासी घेण्यास चाळीसगाव बसच्या वाहकाने बसमध्ये जागा नसल्याने नकार दिला. पाचोरा-फरदापूर बस मधील प्रवाशांना फरदापूर येथे जाण्यासाठी सोयगाव बसस्थानक येथून सकाळी दहा वाजता बस होती. एक तास बसस्थानकावर बसावे लागत असल्याने दोन महिला प्रवासी पाचोरा-फरदापुर बसच्या वाहकाकडे तिकिटाचे पैशांची मागणी केली.वाहकाने तिकिटाचे पैसे परत करण्यास नकार दिला.एक तास सोयगाव बसस्थानकावर थांबल्यास पुढील बस गाड्या निघून जातील त्यामुळे मोठा त्रास सहन करावा लागेल.पुढील बस मिळावी या आशेने संतप्त महिला खाजगी वाहनाने आर्थिक भुदंड सोसत फरदापूर कडे निघून गेल्या. दरम्यान प्रवाशांना होणाऱ्या त्रासाकडे सोयगाव आगाराने दुर्लक्ष केल्याने प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. सोयगाव आगाराचे नियोजन कोलमडले असून प्रवाशांची हेळसांड होत असल्याने विभाग नियंत्रकांनी या आगाराचा कारभार सुधारण्यासाठी वेळीच उपाययोजना करावी अशी मागणी प्रवासीवर्गाकडून होत आहे.
चाळीसगाव-बुलढाणा बसच्या वाहकाने प्रवाशांना बसमध्ये घेण्यास नकार दिल्याने प्रवाशांचा हिरमोड
सोयगाव आगारात नियोजनाचा अभाव, प्रवाशांची हेळसांड, प्रवाशांना सोसावा लागला आर्थिक भुर्दंड
Reviewed by ANN news network
on
५/२३/२०२४ ०४:३७:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: