एक अटकेत; अल्पवयीन ताब्यात!
पुणे : पुणे शहरातील हडपसर येथील चिंतामणी मोटर्स या दुकानाचा दरवाजा फोडून आतील दोन कार चोरून नेणार्या एका चोराला अटक कयारून त्याच्या अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ५ च्या पथकाला यश आले आहे. त्यांच्या कडून दोन कार जप्त करण्यात आल्या आहेत.
पवन शंकर अलकुंटे, वय २० वर्षे, रा.अलकुंटेवस्ती,शंकरमठ, हडपसर असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.
३१ मार्च रोजी रात्री या दोघांनी हडपसर येथील चिंतामणी मोटर्स या दुकानाचा दरवाजा फोडून आतील १० लाख ५० हजार रुपये किमतीच्या २ कार चोरून नेल्या होत्या. याबाबत हडपसर पोलीसठाण्यात गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्याचा तपास पुणे पोलिसांच्या गुन्हेशाखा युनिट ५ चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वजीत काईंगडे आणि त्यांचे सहकारी करत होते. या पथकातील अमित कांबळे यांना ही चोरी पवन अलकुंटे याने त्याच्या मित्राच्या सहाय्याने केली असून तो या पैकी एका गाडीने यवतकडून पुण्याकडे येणार आहे अशी माहिती मिळाली.
ही माहिती मिळाल्यानंतर पोलीसपथकाने शेवाळेवाडी, हडपसर येथे नाकेबंदी केली. त्यामुळे आरोपी आणि त्याचा अल्पवयीन सहकारी एका गाडीसह पोलिसांच्या हाती गवसले. आरोपीकडे चौकशी केली असता त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून दोन्ही कार हस्तगत केल्या आहेत.
ही कामगिरी
पोलीस उपायुक्त, गुन्हे,अमोल झेंडे, सहायक आयुक्त, सतीश गोवेकर,यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक विश्वजीत काईंगडे, उप निरीक्षक अविनाश लोहोटे, अंमलदार प्रताप गायकवाड, शहाजी काळे, दया शेगर, विनोद शिवले, अमित कांबळे, अकबर शेख, राहुल ढमढेरे, पांडुरंग कांबळे व संजयकुमार दळवी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: