मुंबई : भोईवाडा परिसरातील स्थानिक तरुण आणि कट्टरपंथी गट यांच्यातील तणाव मिटवण्यासाठी कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज भोईवाडा पोलीस ठाण्याला भेट दिली. या भेटीने स्थानिक तरुणांना न्याय मिळवून दिला आणि परिसरातील कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
28 मार्च शिवजयंतीच्या दिवशी भोईवाडा परिसरातील तरुण आणि कट्टरपंथी गटात शाब्दिक बाचाबाची झाली.
31 मार्च रोजी भांडणाचे रुपांतर हाणामारीत झाले आणि भोईवाडा परिसरातील तरुणांना धर्मांधांकडून मारहाण करण्यात आली. भोईवाडा पोस्टगल्ली परिसरात राहणाऱ्या पीडितांनी याबाबत पोलीस ठाण्यात तक्रार केली, मात्र पोलिसांनी याबाबत कोणतीही कारवाई केली नाही. उलट पीडितांना पोलिसांनी मारहाण केली आणि चॅप्टर केस दाखल करण्याची धमकी दिली. येथील स्थानिकांनी मंत्री मंगल प्रभात लोढा यांना या प्रकरणाची माहिती दिली, त्यानुसार मंत्री लोढा यांनी कारवाई करण्याचा निर्णय घेतला.
यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री लोढा म्हणाले, "काही कट्टरपंथी लोक मालवणी पॅटर्नची संपूर्ण मुंबईत नक्कल करण्याचा प्रयत्न करत आहेत, आणि भोईवाड्याची ही घटना त्याचाच एक भाग आहे. आम्ही दक्षिण मुंबईला मालवणी होऊ देणार नाही! आज आमचे येथे लोक जमा झाले असून पोलिसांनी त्याची दखल घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेज पाहिल्यानंतर आणि संपूर्ण प्रकरण समजून घेतल्यानंतर पोलिस योग्य ती कारवाई करतील.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: