चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाची लागवड; शेतकर्‍यावर गुन्हा दाखल

 


पिंपरी : चाकण परिसरात मक्याच्या शेतात गांजाची लागवड केल्याचे आढळल्याने पोलिसांनी शेतकर्‍यावर गुन्हा दाखल केला आहे.

सदाशिव आप्पासाहेब देशमुख (वय ६५ वर्षे ), धंदा शेती रा. आगरवाडी रोड, चाकण ता खेड जि पुणे असे गुन्हा दाखल झालेल्या शेतकर्‍याचे नाव आहे.

चाकण पोलीसठाण्याच्या हद्दीत आगरकरवाडी रस्त्यावर गट नंबर २७९ मध्ये असलेल्या मक्याच्या शेतात गांजाची लागवड करण्यात आली असल्याची माहिती २२ एप्रिल रोजी सहायक पोलीस निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड यांना मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पोलीस पथकाने शेतात जाऊन पाहणी केली असता शेतात मोठ्या प्रमाणात गांजाची लागवड केली असल्याचे पोलिसांना दिसून आले. पोलिसांनी या शेतातून २३ किलो वजनाची गांजाची झाडे जप्त केली. या गांजाची  अंदाजित किंमत ११ लाख ५० हजार रुपये असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

या प्रकरणी शेतमालक देशमुख यांच्यावर चाकण पोलीसठाण्यात २०१/२०२४  क्रमांकाने एनडीपीएस अॅक्ट ८ ब, २० अ, २० क अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अधिक तपास सहायक निरीक्षक प्रसन्न जर्‍हाड करत आहेत.

ही कारवाई पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर आयुक्त वसंत परदेशी, उपआयुक्त, परिमंडळ-३ शिवाजी पवार, सहायक आयुक्त, राजेंद्रसिंह गौर यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रमोद वाघ, निरीक्षक गुन्हे संदीप पाटील, तपासपथकाचे प्रसन्न जर्‍हाड, उपनिरीक्षक नामदेव तलवाडे, सहायक फौजदार सुरेश हिंगे, हवालदार ऋषीकुमार झणकर,  संदिप सोनवणे, राजू जाधव, हनुमंत कांबळे,भैरोबा यादव, शिवाजी चव्हाण,  नाईक निखील शेटे, कॉन्स्टेबल नितीन गुंजाळ, सुनील भागवत, संदिप गंगावणे,अशोक दिवटे, प्रदिप राळे, निखील वर्पे,महेश कोळी, माधुरी कचाटे,  चालक रेवन्नाथ खेडकर, नवनाथ खेडकर, चालक महादेव बिक्कड यांनी केली.


चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाची लागवड; शेतकर्‍यावर गुन्हा दाखल चाकण येथे मक्याच्या शेतात गांजाची लागवड; शेतकर्‍यावर गुन्हा दाखल Reviewed by ANN news network on ४/२५/२०२४ ११:४३:०० AM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".