क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा अखेर अटकेत!

पुणे : पुणे सायबर पोलीसठाण्याच्या पथकाने क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणार्‍या एका ठकसेनाला अथक प्रयत्नांनंतर अटक करण्यात यश मिळविले आहे.

संतोष पोपट थोरात, रा. खराडी, पुणे असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.त्याने सोनिटिक्स नावाने क्रिप्टोकरन्सी तयार करुन त्यात गुंतवणूक केल्यास वीस टक्के मोबदला देण्याचे आमिष गुंतवणूकदारांना दाखविले होते. अनेकांनी या आमिषाला भुलून आरोपीकडे आर्थिक गुंतवणूक केली होती. परंतु तो त्या प्रमाणे मोबदला देऊ शकला नाही. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यावर गुंतवणूकदारांनी पोलिसांकडे धाव घेतली. आरोपीने १ कोटी ९ लाख ९० हजार ४२२ रुपयांना फसविल्याने काहीजणांनी दिलेल्या तक्रारीवरून या प्रकरणी आरोपीवर चतुःश्रृंगी पोलीसठाण्यात ७६१/२०२३ क्रमांकाने भारतीय दंडविधान कलम ४०९, ४२० सह महाराष्ट्र ठेविदारांच्या वित्तीय संस्था मधिल हितसंबधाचे संरक्षण अधिनियम सन १९९९ चे कलम ३,४ अन्वये गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात अटक होऊ नये म्हणून आरोपीने जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज दाखल केला होता. न्यायालयाने आरोपीला तात्काळ ४३ लाख ९६ हजार १६८ रुपये १० दिवसांच्या आत उर्वरीत ६५ लाख ९४ हजार २५४ रुपये भरण्याच्या अटीवर जामीन मंजूर केला होता. अरंतु त्याने ही रक्कम भरली नाही. त्याउलट न्यायालयाच्या या आदेशाला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने त्याचा अर्ज नामंजूर केला. तेव्हापासून आरोपी परागंदा होता. तो आपले नाव, ओळख लपवून रहात होता. 

हे प्रकरण पुणे सायबर पोलीसठाण्याकडे सोपविण्यात आल्यानंतर पोलीसपथकाने चिकाटीने तपास करून त्याचा ठावठिकाणा शोधून काढला.२३ एप्रिल रोजी त्याला रो हाउस नं ४२, गेरा वल्ड ऑफ जॉय, खराडी, पुणे येथून  ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आले. त्याला अटक करून न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने २९ एप्रिल पर्यंत पोलीसकोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

या आरोपीने आणखीही गुंतवणूकदारांची फसवणूक केली असावी असा पोलिसांना संशय आहे. आरोपीच्या अंगझडतीत सापडलेल्या दोन मोबाईलचे विश्लेषण सुरू असून त्याचे कार्यालय व घर येथेही तपास केला जात आहे.सोनिटॅक्स नावाच्या क्रिप्टोकरन्सीमध्ये ज्या-ज्या लोकांनी गुंतवणूक केली आहे. त्यांनी सायबर पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे संपर्क साधावा असे आवाहन पोलिसांनी केले आहे.

ही कामगिरी पोलीस उपआयुक्त, आर्थिक व सायबर (गुन्हे)विक्रांत देशमुख, मा सहायक आयुक्त आर. एन. राजे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक मिनल सुपे - पाटील, सहायक फौजदार संदेश कर्णे, अंमलदार संदीप मुंढे, संदीप पवार, दिनेश मरकड, संदीप यादव यांनी केली.

क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा अखेर अटकेत!  क्रिप्टोकरन्सीच्या नावाखाली गुंतवणूकदारांना कोट्यवधींचा गंडा घालणारा अखेर अटकेत! Reviewed by ANN news network on ४/२५/२०२४ ०१:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".