घोसला गावात महावितरणने जळालेले रोहित्र तब्बल १० दिवस बदलले नसल्याने पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही; शेतकरी चिंतेत!

 




दिलीप शिंदे

सोयगाव  : तालुक्यातील घोसला येथे एप्रिल महिन्यात झालेल्या वादळी वाऱ्याच्या तडाख्यात आडवे पडलेले शेती पंपाचे रोहित्र महावितरणने दहा दिवसापासून दुरुस्तीसाठी काढून घेतले आहे. परंतु अद्यापही नवीन रोहित्र मिळाले नसल्याने या परिसरात पाळीव जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी कसरत करावी लागत आहे. बळीराजाला विहिरीतील उपलब्ध पाणी जनावरांना पिण्यासाठी देता येत नसल्यामुळे दहा दिवसापासून रोहित्राअभावी जनावरांच्या घशाची कोरड वाढली आहे दरम्यान वादळीवाऱ्याच्या तडाख्यात रोहित्रासह वीजेचेखांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे घोसला शिवारात गेल्या दहा दिवसापासून शेतीपंपाची वीज ठप्प झाली आहे त्यामुळे उन्हाळी पिकांना पाणी भरता येत नसल्यामुळे  पिके उन्हात करपत आहेत. महावितरणकडे शेतकऱ्यांनी मागणी केल्यास अभियंता व लाईनमन टोलवाटोलवी करत असल्याचे शेतकरी सुनील अरुण पाटील यांनी सांगितले शेतातील पाण्याचा जनावरांना हौद ही भरता येत नसल्याचे त्यांनी सांगितले .

उन्हाळी पिके सोडा पण जनावरांचे बघा
उन्हाळी हंगाम करपला तरी चालेल परंतु जनावरांना पाणी टंचाईच्या विळख्यातून बाहेर काढा दहा दिवसापासून घोसला गावातील जनावरांना पिण्याचे पाणी मिळत नाही त्यामुळे जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागत आहे असे येथील शेतकऱ्यांनी बोलून दाखविले आहे महावितरण मात्र रोहित्र बसविण्यासाठी व बिघाड दूर करण्यासाठी टाळाटाळ करत असल्याचा आरोप सुनील पाटील यांनी केला आहे.
घोसला गावात महावितरणने जळालेले रोहित्र तब्बल १० दिवस बदलले नसल्याने पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही; शेतकरी चिंतेत! घोसला गावात महावितरणने जळालेले रोहित्र तब्बल १० दिवस बदलले नसल्याने  पाळीव जनावरांना पिण्यासाठी पाणी नाही; शेतकरी चिंतेत! Reviewed by ANN news network on ४/२४/२०२४ ०९:२३:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".