पिंपरी : मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याच्या संशयावरून दत्तनगर, चिंचवड येथे २१ एप्रिल रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास चौघांनी एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याचा खून केला.
याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात 35 वर्षीय महिलेने तक्रार दिली आहे. सुरेश लोडबा ढेंबरे (वय-21 रा. दत्तनगर, चिंचवड) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तक्रारीवरून संतोष चौघुले (वय 25, रा. चिंचवड), याला अटक करण्यात आली असून त्याच्यासह दोन महिला आणि संतोष याचा एक मित्र यांच्या विरोधात भारतीय दंडविधान 302, 34 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत सुरेश ढेंबरे फिर्यादीचा दीर होता. त्याचे आरोपी महिलेच्या मुलीसोबत प्रेमसंबंध असल्याचा संशय आरोपींना होता. याच कारणावरून आरोपींनी सुरेश याला लाथाबुक्क्यांनी व कमरपट्ट्याने बेदम मारहाण केली.यामुळे सुरेशचा मृत्यू झाला.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: