दिलीप शिंदे
सोयगाव : जागतिक वसुंधरा दिनानिमित्त सिल्लोड शहरातील यशवंतराव चव्हाण कला ,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात दि.२२ सोमवारी जैवविविधता संवर्धक डॉ संतोष पाटील यांनी विकसित केलेल्या दुर्मिळ रोपांचे प्राचार्य प्रा.डॉ. अशोक पंडीत यांचे हस्ते माणिकराव पालोदकर वनस्पती उद्यानात रोपण करणात आले.
सण २०२४ या वर्षी ची थीम अर्थ अगेन्स्ट प्लास्टिक अँड पोलूटंट अशी असून या अनुषंगाने दुर्मीळ होत असलेल्या कामला-,कुंकुमाची रोपे लावण्यात आली. आज जे आपण कुंकू वापरतो ते मर्क्युरी सल्फाइड पासून बनते व ते पाऱ्याचे संयुग असून पर्यावरणास ते हानिकारक आहे. आज रोपित करण्यात आलेल्या झाडापासून नैसर्गिक कुंकू बनवता येते व तो उपरोक्त रसायनाचा पर्याय आहे व जागतिक तापमान वाढ रोखण्यासाठी सर्व भारतीय झाडे या निमित्ताने विविध ठिकाणी कॉलेज च्या मदतीने रोपण करण्यास सुरुवात केली आहे असे डॉ. संतोष पाटील यांनी सांगितले. सदर वेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.अशोक पंडित, प्रा डॉ जगदीश सावदेकर , डॉ .संतोष पाटील,प्रा.अतुल इंगळे ग्रंथपाल प्रा.हिलाले सर,प्रा.बदर के.वि.आदी सह पदव्युत्तर विभागाचे असंख्य विद्यार्थी उपस्थिती होते.
जागतिक वसुंधरा दिनानिमित्त यशवंतराव चव्हाण महाविद्यालयात दुर्मीळ प्रजातींचे रोपण...
Reviewed by ANN news network
on
४/२२/२०२४ ०९:१४:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: