· युरोपमधील आघाडीची क्लाउड गेमिंग कंपनी केयरगेमच्या सहयोगाने ही सेवा सुरु करण्यात आली आहे
· ही सेवा 'ट्राय एन बाय' मॉडेलमध्ये मोफत ट्रायल पिरियडसह उपलब्ध असणार आहे.
· क्लाउड प्ले अँड्रॉइड आणि आयओएस हॅन्डसेटवर अतिशय उत्तम गेमिंग अनुभव, अगदी लगेचच मिळवता येतो, त्यासाठी कोणत्याही डाउनलोडची आवश्यकता नसते.
मोबाईलला सर्वाधिक प्राधान्य या ट्रेंडमुळे भारतात गेमिंग उद्योगक्षेत्राची प्रचंड वाढ होत आहे. उद्योगक्षेत्रातील अहवालांनुसार, देशात गेमिंगची बाजारपेठ बिलियन डॉलर्सवर जाऊन पोहोचेल असा अंदाज असून, भविष्यात गेमिंग विश्वात क्लाउड गेमिंग हे सर्वाधिक आघाडीवर असेल. ग्राहकांच्या सातत्याने बदलत्या आणि वाढत्या आवडीनिवडी पूर्ण करण्यासाठी टेलिकॉम ऑपरेटर वी ने क्लाउड प्ले ही मोबाईल क्लाउड गेमिंग सेवा सुरु करण्यासाठी केयरगेम या पॅरिस येथे मुख्यालय असलेल्या कंपनीसोबत भागीदारी केली आहे.
मोबाईल गेमिंग सेवा अधिक मजबूत करत 'क्लाउड प्ले' प्रीमियम एएए गेम्सची वैविध्यपूर्ण श्रेणी सादर केली आहे. यामध्ये ऍक्शन, साहस, आर्केड, रेसिंग, स्पोर्ट्स आणि स्ट्रॅटेजी अशा विविध शैलींतील गेम्सचा समावेश आहे. लॉन्च कॅटलॉगमध्ये अस्फाल्ट ९, मॉडर्न कॉम्बॅट ५, शॅडो फाईट, स्टॉर्म ब्लेड्स, रीपटाइड, बीच बगी रेसिंग, ग्रॅव्हिटी रायडर आणि कट द रोप, सबवे सर्फर्स असे मोबाईल गेम्स आणि जेटपॅक जॉयराईड यासारख्या क्लासिक्सचा समावेश आहे. येत्या आठवड्यांमध्ये अजून अनेक एकापेक्षा एक सरस गेम्स रीलीज केले जातील.
क्लाउड प्ले ही सेवा सबस्क्रिप्शनवर आधारित असून याची किंमत दर महिन्याला १०० रुपये आहे. (प्रीपेड युजर्ससाठी १०४ रुपये रिचार्ज) सबस्क्रिप्शन पॅक खरेदी करण्यापूर्वी शुभारंभाची ऑफर म्हणून युजर्सना या सेवेचे मोफत सॅम्पल देखील उपलब्ध करवून दिले जाईल.
वी क्लाउड प्ले सोबत गेमर्स लगेचच खेळायला सुरुवात करू शकतील. वेगवेगळे गेम्स डाउनलोड करण्याची आवश्यकता उरणार नाही. यामध्ये हाय-फिडेलिटी गेम्स आहेत, ज्यांचे ग्राफिक्स अतिशय उत्तम आहेत, यामध्ये मल्टीप्लेयर गेमिंग देखील उपलब्ध आहे. यामुळे डिव्हाईसच्या अतिशय मौल्यवान मेमरीची बचत केली जाते, शिवाय अतिरिक्त हॅन्डसेट अपग्रेड्स करावे लागत नाहीत, त्यामुळे युजर्सच्या खर्चात लक्षणीय बचत होते.
क्लाउड प्ले लॉन्च प्रसंगी वोडाफोन आयडियाचे सीएमओ श्री अवनीश खोसला यांनी सांगितले, "वीमध्ये आम्ही ग्राहकांना प्रदान केल्या जात असलेल्या सेवासुविधा अधिक प्रभावी करण्यासाठी सहयोगात्मक दृष्टिकोन ठेवून काम करतो. वेगाने वाढत असलेल्या गेमिंग उद्योगाच्या क्षमता आम्ही जाणतो, गेमिंगचा लाभ जास्तीत जास्त लोकांना कधीही, कुठेही घेता यावा यासाठी स्मार्टफोन खूप मोलाची भूमिका बजावत आहे. केयरगेमच्या सहयोगाने वी गेम्स 'क्लाउड प्ले' सह आम्ही आमच्या युजर्सचे गेमिंगच्या भविष्यात स्वागत करतो, याठिकाणी क्लाउड हे तुमचे प्लेग्राऊंड आहे आणि याठिकाणी तुमच्यासाठी अमर्याद संधी उपलब्ध आहेत. हा फक्त गेम नाही तर कल्पना व तंत्रज्ञान यांचा मिलाप जिथे होतो अशा विश्वातील ही अखंड वाटचाल आहे. प्लेटाईमचा जास्तीत जास्त आनंद घ्या आणि असामान्य गोष्टींचा शोध घ्या."
वी गेम्स क्लाउड प्ले लॉन्च करण्यासाठी वी सोबत करण्यात आलेल्या भागीदारीबद्दल केयरगेम्सचे सह-संस्थापक आणि सीईओ फिलिप वँग यांनी सांगितले, "क्लाउडप्लेमुळे भारतातील सर्व गेमर्सना अस्सल एएए मोबाईल गेमिंगचा आनंद घेता येईल, त्यासाठी नवीन मोबाईल फोन किंवा गेमपॅडचा खर्च करावा लागणार नाही. केयरगेम टेक्नॉलॉजी, आमच्या पब्लिशिंग पार्टनर्सकडील उत्तमोत्तम मोबाईल टायटल्स आणि वी नेटवर्क्सच्या भागीदारीमुळे हे शक्य होत आहे. आम्ही सर्व वी युजर्सना क्लाउड प्लेचा लाभ घेऊन गेमलॉफ्टच्या अस्फाल्ट ९: लिजंड्सच्या एक्सक्लुसिव्ह व्हर्जनमध्ये मित्रांना चॅलेंज करण्यासाठी आमंत्रित करत आहोत. सर्व मल्टीप्लेयर मोड अनलॉक करा, दोन बोनस कार व इतर सरप्रायझेससह या चित्तथरारक रेसेसचा आनंद घ्या."
वी गेम्स क्लाउड प्ले हे वी वेब आणि वी ऍप या दोन्ही प्लॅटफॉर्म्समार्फत अगदी सहजपणे ऍक्सेस करता येते. ग्राहकांसोबतचे आपले संबंध घनिष्ठ करण्यासाठी एक महत्त्वाचा अजेंडा म्हणून गेमिंगवर सर्वाधिक भर असल्याचे वी ने केयरगेम्ससोबत भागीदारीतून दर्शवले आहे. आपल्या युजर्सना अतिशय अनोखे डिजिटल अनुभव प्रदान करण्यासाठी वी ने हाती घेतलेल्या विविध उपक्रमांमध्ये हे आणखी एक महत्त्वाकांक्षी पाऊल आहे.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: