पाच वर्षांसाठी उपाध्यक्ष आणि सहव्यवस्थापकीय संचालक म्हणून नियुक्त
पुणे: नाविन्यपूर्ण अभियांत्रिकी सोल्यूशन्सची आघाडीची जागतिक प्रदाता कंपनी असलेल्या भारत फोर्जने अमित कल्याणी यांची पाच वर्षांच्या कालावधीसाठी उपाध्यक्ष आणि सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून पुनर्नियुक्तीची घोषणा केली. कंपनीच्या संचालक मंडळाने 3 एप्रिल 2024 रोजी झालेल्या बैठकीत हा निर्णय घेतला. या भूमिकेत अमित वाढ आणि नावीन्यता आणण्यासाठी कंपनीच्या धोरणात्मक दिशा संचालनासाठी, त्याच्या व्यापक अनुभवाचा आणि दूरदर्शी नेतृत्वाचा फायदा घेऊन निर्णायक भूमिका बजावत राहतील..
श्री अमित कल्याणी हे 1999 पासून भारत फोर्जशी जोडलेले आहेत. त्यांनी आयटी आणि फायनान्समध्ये जाण्यापूर्वी ऑपरेशन्स आणि मॅन्युफॅक्चरिंगवर लक्ष केंद्रित करून त्यांची कारकीर्द सुरू केली. मे 2004 पासून ते कंपनीचे कार्यकारी संचालक आहेत. कंपनीने केलेल्या अनेक अधिग्रहणांच्या धोरणात आणि अंमलबजावणीमध्ये त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि नवीन उपक्रमांमध्ये पायनियरिंग करून व्यवसायात वैविध्य आणण्याबरोबरच कंपनीच्या यशामध्ये मोठ्या प्रमाणावर योगदानही त्यांनी दिले आहे. नवीन युगातील तंत्रज्ञानासह ऑरगॅनिक वाढीला गती देण्याच्या उद्दिष्टांशी संरेखित मानव संसाधन पद्धती आणि प्रक्रिया सुधारण्यावर त्यांचे सध्याचे लक्ष आहे.
भारत फोर्जमध्ये श्री. अमित कल्याणी यांनी ESG उत्सर्जन कमी करण्यात आणि कंपनीच्या एकूण ESG स्कोअरमध्ये सुधारणा करण्यासाठी, अक्षय ऊर्जेचा वापर वाढवण्यासाठी पुढाकार, डिजिटायझेशन, कंपनीच्या ऑपरेशन्स आणि उत्पादकता आणखी सुधारण्यासाठी डिजिटल प्रगतीसह कंपनीच्या धोरणांमध्ये सुधारणा करण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. उत्पादन, शिक्षण, कौशल्य विकास आणि द्विपक्षीय संबंधांवरील भारत सरकारच्या अनेक समित्यांचे ते सदस्य आहेत. उत्पादन, तंत्रज्ञान आणि CSR बद्दल विशेषत: शिक्षण, आरोग्य सेवा आणि समाजाला परत देण्याबद्दल ते अत्यंत पॅशेनेट आहे.
Reviewed by ANN news network
on
४/०४/२०२४ ०९:३०:०० PM
Rating:

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: