भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 

पिंपळे गुरव येथील निवासस्थानी कार्यकर्ते, मित्रमंडळींच्या लक्षणीय गर्दीने उत्सवाचे वातावरण; शहरभर विविध कार्यक्रमांचे आयोजन

 

पिंपरी : पिंपरी चिंचवड शहर भाजपाचे शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा ०५ एप्रिल रोजी वाढदिवस त्यांच्या आप्तेष्टांनी आणि कार्यकर्त्यांकडून मोठया उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगामुळे त्यांच्या पिंपळे गुरव येथील निवासस्थानी कार्यकर्ते आणि मित्रमंडळींच्या लक्षणीय गर्दीने त्याठिकाणी उत्सवाचे वातावरण पाहायला मिळाले. त्यांच्या वाढदिवसानिमीत्त शहरातील ६ ठिकाणी हजारो कार्यकर्त्यांना मोफत “स्वातंत्र वीर सावरकर” हा चित्रपट दाखविण्यात आला. तसेच, त्या त्या ठिकाणी पदाधिकारी – पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केक कापून वाढदिवस साजरा केला.


स्व.लोकनेते आमदार लक्ष्मण जगताप यांचा वारसा पुढे नेत असताना, समाजात वेळोवेळी सामाजिक कार्य शंकर जगताप यांच्या हातून घडत आहेत. महाआरोग्य शिबिरदिव्यांगांना मदतमहिलांचे बचत गटाद्वारे मदत, शालेय विद्यार्थी साहित्य वाटप, अशा विविध सामाजिक कार्यातून शंकर जगताप नेहमीच जनसामान्यात त्यांच्या सेवेसाठी उपस्थित राहतात. जगताप परिवार हा नेहमीच धार्मिकसामाजिकशैक्षणिकराजकीय अशा विविध क्षेत्रात पिंपरी चिंचवड शहरातील नागरिकांच्या सर्व समस्या जाणून त्यांचे निवारण करीत असतात. त्यांच्याकडून सदैव अधिकाधिक सामाजिक कार्य घडो, अशा शुभेच्छा यावेळी उपस्थितांकडून देण्यात आल्या.

 

आनंदी उत्सवाने कौटुंबिक बंधांचे महत्त्व जपणारे शंकर जगताप यांच्या संघटनात्मक कौशल्याचे कौतुक आजच्या या वाढदिवसाच्या निमीत्ताने शहरवासियांनी अनुभवलेयावेळी, खासदार श्रीरंग बारणे, आमदार महेश लांडगे, आमदार अश्विनी जगताप, आमदार उमा खापरे, मावळ लोकसभा संयोजक सदाशिव खाडे, महिला मोर्चा अध्यक्षा सुजाता पालांडे, सरचिटणीस नामदेव ढाके, विलास मडेगिरी, संजय मंगोडेकर, अजय पाताडे, शितल शिंदे, शैला मोळक, प्रवक्ते राजू दुर्गे, चिंचवड  विधानसभा प्रमुख काळूराम बारणे, पिंपरी ‍विधानसभा प्रमुख अमित गोरखे, युवा मोर्चा अध्यक्ष तुषार हिंगे, यांच्यासह राज्यपातळीवरील पदाधिकारी, पक्षाचे कार्यकर्ते, जिल्हा पदाधिकारी,  त्यांच्या व्यावसायिक, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक आणि राजकीय मंडळी तसेच कार्यकर्त्यांनी मोठया संख्येने शुभेच्छांचा वर्षाव केला. शुभेच्छा आणि कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रियजनांना आणि समर्थकांना या निमित्ताने संधी मिळाली.


भल्या पहाटेपासूनच शंकर जगताप यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी भाजपचे कार्यकर्ते आणि पदाधिका-यांची मोठी गर्दी होवून, त्यांच्या घरी उभारलेल्या मोठ्या पंडालच्या उपस्थितीने पक्षाची एकजूट आणि कार्यकर्त्यांचा पाठिंबा, त्यांना असणारी नागरिकांची साथ मोठया प्रमाणात दिसून आलीशंकर जगताप यांना हितचिंतक मिळाल्यानेशुभेच्छांची देवाणघेवाण आणि एकजुटीचे प्रदर्शन यामुळे कार्यक्रमाच्या उत्साहात भर पडली. तसेच, पिंपरी विधानसभेती भाजपा पदाधिकारीकार्यकर्ते यांनी शंकर जगताप यांना वाढदिवसानिमित्त महापुरुषांना अभिवादन करुन, महापुरुषांचे स्मारक स्वच्छ करून त्यांना पुष्पहार अर्पण मानवंदन दिली.

शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांचे आभार मानले. त्यांनी म्हटले आहे की,"माझ्या वाढदिवसानिमित्त मला कार्यकर्त्यांनी आणि समर्थकांनी शुभेच्छा आणि आशीर्वाद पाठवले. मला तुमच्या प्रेमाचा आणि पाठिंब्याचा खूप आनंद आहे. तुमच्या शुभेच्छांमुळे मला नवीन ऊर्जा मिळाली आहे आणि मी माझ्या जबाबदाऱ्या अधिक उत्साहाने पार पाडण्यास प्रेरित झालो आहे."  "पिंपरी चिंचवड शहराच्या विकासासाठी मी कार्यरत आहे. आपल्या सर्वांच्या सहकार्यानेच हे काम पूर्ण होऊ शकते. मला खात्री आहे कीतुमच्या पाठिंब्यामुळे आम्ही पिंपरी चिंचवड शहराला एक आदर्श शहर बनवू शकू."पिंपरी चिंचवड शहराध्यक्षपदासह अजून जबाबदारी वाढल्याचे सांगत शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी कार्यकर्त्यांचे व शहरवासियांचे आभार मानले.  

भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा वाढदिवस उत्साहात साजरा भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांचा वाढदिवस  उत्साहात साजरा Reviewed by ANN news network on ४/०६/२०२४ १०:००:०० PM Rating: 5

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

Blogger द्वारे प्रायोजित.
Do you have any doubts? chat with us on WhatsApp
Hello, How can I help you? ...
Click me to start the chat...
".