वाकड पोलिसांची कामगिरी
पिंपरी : पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या अखत्यारीतील वाकड पोलीसठाण्याच्या पथकाने ४ मार्च रोजी वाकड येथे एका सोसायटीत छापा घालून दहा जणांना अटक केली असून दोघे फरार आहेत. सर्वजण बिहार आणि छत्तीसगड येथील रहिवासी आहेत फरार असलेल्यांपैकी एक नागपूर येथील असून दुसरा छत्तीसगड येथील आहे. यामुळे अन्य राज्यातील सटोडीये आता सट्टा घेण्यासाठी पिंपरी चिंचवड शहरात येऊ लागले असून या गुन्ह्याची पाळेमुळे अन्य राज्यात पसरली असल्याचे सिद्ध झाले आहे.
पोलिसांनी या प्रकरणात 6 लाख 58 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
सुर्यप्रताप कौशल्य सिंग (वय 18), राजेश छोटेलाल कुराबहु (वय 20), रणजित सुरज मुखीया (वय 20), शुभम पुलसी धरू (वय 22),तिलेश अमित कुमार कुरेह (वय 25), जितू नविन हरपाल (वय 28), राहूल कुमार प्रकाश उराव (वय 22), यश प्रसाद शाहू (वय 18), किशन मनोज पोपटानी (वय 22), समया सुखदास महंत (वय 22) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर कार्तिक उर्फ दिनेश आहुजा व रामू बोमन हे दोघे फरार आहेत.
वाकड येथे मिलेनियम मॉल शेजारी असलेल्या वेस्टर्न अव्हेन्यू सोसायटीमध्ये गुजरात टायटन्स विरुद्ध किंग्स इलेव्हन पंजाब यांच्यात सुरु असलेल्या टी-20 सामन्यावर वेगवेगळ्या बेंटीग अॅपद्वारे बेटींग घेतले जात असल्याची माहिती पोलिसांना मिळली. पोलिसांनी तेथे छापा घातला. आणि आरोपींना अटक केली. बनावट बँक खात्यांद्वारे पैशांची देवाणघेवाण करणारे कार्तिक उर्फ दिनेश आहुजा व रामू बोमन फरार झाले आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: