पिंपरी : सांगवी पोलीसठाण्याच्या पथकाने काल १ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख येथे एका तरुणाला मेफेड्रोन हा अमलीपदार्थ पिशवीतून घेऊन जात असताना अटक केली होती. त्याच्याकडील पिशवीतून सुमारे २ कोटी रुपयांचे मेफेड्रोन जप्त करण्यात आले होते. या तरुणाने चौकशीमध्ये निगडी येथे कार्यरत असलेल्या एका पोलीस उपनिरीक्षकाचे नाव घेतल्यामुळे त्या उपनिरीक्षकाला अमलीपदार्थ विरोधी पथकाने अटक केली आहे. या प्रकारामुळे पिंपरी चिंचवड पोलीसदल हादरले आहे. या उपनिरीक्षकाला आज न्यायालयासमोर हजर करण्यात येणार आहे.
विकास शेळके असे या उपनिरीक्षकाचे नाव असून तो निगडी पोलीसठाण्यात कार्यरत आहे.
नमामी शंकर झा, वय ३२ वर्षे, रा.संजय पाटील यांचे खोलीत, सेक्टर नं. २७, भेल चौक, निगडी पुणे मूळ गाव मेहनात पैवती, ता. महीनाम, जि. दरभंगा, राज्य - बिहार याला पिंपरी चिंचवड शहरातील सांगवी पोलीसठाण्याच्या पथकाने १ मार्च रोजी पहाटे साडेचारच्या सुमारास पिंपळे निलख भागात ताब्यात घेऊन त्याच्याकडून २ किलो ३८ ग्रॅम मेफेड्रोन जप्त केले होते.त्याला न्यायालयाने ७ दिवसांची पोलीसकोठडी दिली होती. अधिक तपासामध्ये त्याच्याकडे निगडी येथे असलेले आणखी ४२ किलो ७७० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले. या प्रकरणात एकूण ४४ किलो ७९० ग्रॅम मेफेड्रोन जप्त करण्यात आले असून त्याची किंमत ४४ कोटी ७९ लाख ८० हजार रुपये इतकी आहे. हे मेफेड्रोन त्याच्याकडे कसे आले याची चौकशी पोलीस करत असताना त्याने उपनिरीक्षक विलास शेळके याचे नाव घेतल्यामुळे अमलीपदार्थ विरोधी पथकाने शेळके यालाही अटक केली आहे.
या सर्व प्रकरणात पोलीस अधिकार्याला अटक झाल्यामुळे पिंपरी चिंचवड पोलीसदल हादरले आहे.
दरम्यान पुणे, पिंपरी चिंचवड परिसरात अमलीपदार्थांची विषवल्ली पोलिसांच्या आधाराने फोफावत आहे का? अशी चर्चा नागरिकात सुरू झाली आहे.
ही कामगिरी पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे, अपर पोलीस आयुक्त वसंत परदेशी, उपायुक्त संदीप डोईफोडे, स्वप्ना गोरे, शिवाजी पवार, सहायक आयुक्त डॉ. श्री विशाल हिरे, बाळासाहेब कोपनर यांच्या मार्गदर्शनाखाली अमलीपदार्थ विरोधी पथकाचे वरिष्ठ निरीक्षक वैभव शिंगारे, सहायक निरीक्षक प्रशांत महाले, सचिन कदम, व अंमली पदार्थ विरोधी पथकाच्या कर्मचार्यांनी यांनी केली.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत: